१०८ ओळींचे दीर्घ काव्यातून१०८ हुतात्म्यांना अभिवंदन
कंधार
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र लढ्याला आज एकसष्ट वर्ष पुर्ण झाली.पुर्ण राज्यभर या दिवशी ध्वजारोहण करुन तिरंगी राष्ट्रध्वजला सलामी देवून मुंबई येथे हुतात्मा स्मारकास अभिवादन करतात.या लढ्यात महाराष्ट्राचे १०८ लढवय्य वीर रत्नांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.या वर्षा सुंदर अक्षर कार्यशाळा शिवाजी नगर कंधार. सुलेखनकार गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजी क्रांतिभुवन बहाद्दरपुरा या क्रांतिनगरातील गुरुजींनी “महाराष्ट्राची महती” १०८ ओळींचे दीर्घ काव्य लिहून महाराष्ट्राच्या शुर हुतात्म्यांना अनोखे अभिवादन केले आहे.
कंधार तालुक्यातील क्रांतिभुवन बहाद्दरपुरा या माझ्या नगरीत टोकरा समितीच्या अर्थसहाय्यातून हुतात्म्यांचे स्मृतिस्मारक “क्रांति टावर” माझे दोन्हीही उर्जास्त्रोत ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी,माजी खासदार व आमदार, विद्रोही विचारवंत डाॅ.भाई केशवराव धोंडगे यांच्या संकल्पनेतून अन् त्यांचे जिवलग मित्र केशवसखा,माजी आमदार, मन्याड खोर्यातील कलामहर्षि भाई गुरुनाथराव कुरुडे यांच्या सहकार्याने निर्माण झाले.
या शौर्यास्मारका समोर छ.शिवाजी महाराजांचा रुबाबदार पुर्णाकृती पुतळा आहे.दर वर्षी महाराष्ट्र दिनी (कामगार दिन) विद्युत रोषणाई करुन अभिवादन केले जाते.महाराष्ट्र दिन निर्मितीस बलिदान देणाऱ्या वीर हुतात्म्यांना विनम्रभावे अभिवादन!
सुंदर अक्षर कार्यशाळा शिवाजी नगर कंधार
महती महाराष्ट्राची”
रचनाकार-गोपाळसुत
महाराष्ट्राची विशालकाय उंची।
शोभे कळसुबाई शिखरावर॥
महाराष्ट्री भाषाश्री मायबोली।
स्वाभिमानी खरी विश्वस्तरावर॥
शालिवाहन शककर्त्यांची नगरी।
पैठण गंगथडीच्या बांधावर॥
निधड्या छातीचा शूर महाराष्ट्र।
दिसे इतिहासच्या पानापानांवर॥
संत-महाम्ये जन्माची पुण्यभूमी।
माऊली,तुकोबांच्या अभंगावर॥
शिवबांचे स्वराज्य निर्माण झाले।
मर्द मावळ्यांच्या सहकार्यावर॥
सुवर्णकाळ राज्याचा दिसला।
शिवरायांच्या गनीमी शौर्यावर॥
छ.संभाजी महाराज चमकले।
तेजबुध्दी व युध्द कौशल्यावर॥
भीमालयांनी संविधान लिहिले।
आधारली लोकशाहीच त्यावर॥
बौद्धधम्म स्विकारला भीमांनी।
उपराजधानीत दीक्षा भूमीवर॥
खालसा पंथाची दक्षिण काशी।
नंदीग्रामच्या पवित्र धरतीवर॥
समाज क्रांतीबा ज्योती फुलेंनी।
आसूड ओढले धर्ममार्तंडावर॥
स्वतः त्रास सावित्रींनी सोसला।
नारीस सन्मान दिला शिक्षणावर॥
अण्णाभाऊंच्या साहित्याची धार।
ग्रामिण व्यथांच्या परिस्थितीवर॥
प्रसिद्ध शाहीर दादा कोंडकेंनी।
हसवले व्दिअर्थाच्या विनोदावर॥
कणखर बाळ गंगाधर टिळक।
लोकमान्यच करारी बाण्यावर॥
सावरकरांची काळेपाणी शिक्षा।
अंदमान-निकोबारच्या बेटावर॥
शिर्डीचे साईबाबा एकात्मतेचे।
मंदिर शोभे भक्तीचे माहेरघर॥
सातवाहन,वाकाटक, राष्ट्रकूट।
चालूक्य, शिलाहार,चौल, यादव।
घराण्याची भिस्त राजेशाहीवर॥
आधी कळस मग पायाही वास्तू।
कैलास लेणे दिसते पाहिल्यावर॥
जागतिक अश्चर्य ताज महलची।
सावली बीवी का मकबर्यांयावर॥
जलमार्गाचा गेट वे ऑफ इंडिया।
बाबा आमटेंच्या रे कर्मभुमीवर॥
लावणी महाराष्ट्राची लोककला।
प्रबोधनाची मदारच कीर्तनावर॥
वारकरी संप्रदायाचे श्रध्देश्वर।
चंद्रभागा नदीच्या तीरी विठेवर॥
माळकरी सदभक्तांची मांदियाळी।
आषाढी व कार्तिकी एकादशीस।
भीमा नदीच्या चंद्रकोर थडीवर॥
भारुडकार मानवतेचे संत महात्मे।
नामदेवाची भुत दया गर्दभावर॥
थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर।
रतनजी टाटा सर्वश्रेष्ठ दानवीर॥
आदिमाया शक्तींची साडेतीनपिठे।
सिंधुताईंचे ममत्व विश्वस्तरावर ॥
नारी विराजमान राष्ट्रपती पदी
होत्या प्रतिभाताई कार्यतत्पर
अष्टविनायकांची विघ्नहर्ता स्थळे।
संस्कृतीक पुणेरी पंचक्रोशीवर॥
संत गाडगे बाबांचा कीर्तनातून।
प्रहार अस्वच्छता व अंधश्रद्धेवर॥
असंख्य नद्यांच्या प्रवाहामुळेच।
कृषकांचे पिक रग्गड उत्पन्नावर॥
३६ जिल्हे अन् ३५८ तालुक्यांनी।
व्यापले क्षेत्र महाराष्ट्राच्या भूमीवर॥
सत्तावीस हजार अठराशे पंचावन्न।
ग्राम पंचायतीचे भार सरपंचावर॥
सव्वादोनशे नगरपालिका व २७।
महानगरपालिका प्रगतीपथावर॥
यशवंत चव्हाण भाग्य विधाते।
आरुढारंभी मुख्यमंत्री पदावर॥
मायानगरी मुंबापुरी सांभाळली।
हिंदुह्रदय सम्राटांच्या कतृत्वावर॥
लतादीदी झाल्या गानकोकिळा।
निष्णात सुमधुर आवाजावर॥
भीमसेन जोशींचे शास्त्रीय गायन।
भाव व भक्तींच्या सुरेल गीतांवर॥
क्रिकेट विश्वाचा देवच तेंडुलकर।
सचिन सर्वश्रेष्ठ झाला खेळावर॥
वि.स.खांडेकर साहित्यिक सहित।
दिग्गज साहित्यिक महाराष्ट्रभर॥
अचार्य अत्रे अन् डाॅ.भाई धोंडगे।
यांच्यात व्दंद रंगले शब्दशस्त्रांवर॥
कृषीरत्न वसंतराव नाईकांची।
धडपड अखंडीत कृषीक्रांतीवर॥
नृत्याचे कोहिनूर बालगंधर्व।
स्त्री पात्र नटवले रंगभूमीवर॥
सातासमुद्रापार लावणी गाजली।
पुणेकरांच्या सुरेख अदाकारीवर॥
द्रुतगती मार्गाचा खरा बादशाह।
गडकरींचे लक्ष रोड बांधण्यावर॥
विधानसभेत गायले वंदेमातरम्।
डाॅ.भाई धोंडगेंच्या प्रस्तावावर॥
न्याय मंदिरातील उज्ज्वल कर्माने।
निकम यांची नजर गुन्हेगारांवर॥
रविवारची सुट्टी आम्हा मिळाली॥
नारायण लोखंडे यांच्या प्रयत्नांवर॥
गोपीनाथ, विलास, प्रमोद दिग्गज।
लोकनेते बनले नेतृत्व गुणावर॥
मोरारजी भाईंच्या क्रुर आदेशांनी।
गोळ्या घातल्या रे हुतात्म्यांवर॥
महाराष्ट्र दिनाची खरी निर्मिती।
१०८ हुतात्म्यांच्या बलिदानावर॥
माझे शब्दकाव्य नतमस्तक झाले।
१०८ शूर हुतात्म्यांच्या जीवनवर॥
गोपाळसुत———–‐————
दत्तात्रय एमेकर गुरुजी,
क्रांतिभुवन बहाद्दरपुरा,
९८६०८०९९३१
हुतात्म्यांची नावे
२१ नोव्हेंबर इ. स. १९५५ चे हुतात्मे[३]
१] सिताराम बनाजी पवार
२] जोसेफ डेव्हिड पेजारकर
३] चिमणलाल डी. शेठ
४] भास्कर नारायण कामतेकर
५] रामचंद्र सेवाराम
६] शंकर खोटे
७] धर्माजी गंगाराम नागवेकर
८] रामचंद्र लक्ष्मण जाधव
९] के. जे. झेवियर
१०] पी. एस. जॉन
११] शरद जी. वाणी
१२] वेदीसिंग
१३] रामचंद्र भाटीया
१४] गंगाराम गुणाजी
१५] गजानन ऊर्फ बंडू गोखले
१६] निवृत्ती विठोबा मोरे
१७] आत्माराम पुरुषोत्तम पानवलकर
१८] बालप्पा मुतण्णा कामाठी
१९] धोंडू लक्ष्मण पारडूले
२०] भाऊ सखाराम कदम
२१] यशवंत बाबाजी भगत
२२] गोविंद बाबूराव जोगल
२३] पांडूरंग धोंडू धाडवे
२४] गोपाळ चिमाजी कोरडे
२५] पांडूरंग बाबाजी जाधव
२६] बाबू हरी दाते
२७] अनुप माहावीर
२८] विनायक पांचाळ
२९] सिताराम गणपत म्हादे
३०] सुभाष भिवा बोरकर
३१] गणपत रामा तानकर
३२] सिताराम गयादीन
३३] गोरखनाथ रावजी जगताप
३४] महमद अली
३५] तुळशीराम पुंजाजी बेलसरे
३६] देवाजी सखाराम पाटील
३७] शामलाल जेठानंद
३८] सदाशिव महादेव भोसले
३९] भिकाजी पांडूरंग रंगाटे
४०] वासुदेव सुर्याजी मांजरेकर
४१] भिकाजी बाबू बांबरकर
४२] सखाराम श्रीपत ढमाले
४३] नरेंद्र नारायण प्रधान
४४] शंकर गोपाल कुष्टे
४५] दत्ताराम कृष्णा सावंत
४६] बबन बापू भरगुडे
४७] विष्णू सखाराम बने
४८] सिताराम धोंडू राडये
४९] तुकाराम धोंडू शिंदे
५०] विठ्ठल गंगाराम मोरे
५१] रामा लखन विंदा
५२] एडविन आमब्रोझ साळवी
५३] बाबा महादू सावंत
५४] वसंत द्वारकानाथ कन्याळकर
५५] विठ्ठल दौलत साळुंखे
५६] रामनाथ पांडूरंग अमृते
५७] परशुराम अंबाजी देसाई
५८] घनश्याम बाबू कोलार
५९] धोंडू रामकृष्ण सुतार
६०] मुनीमजी बलदेव पांडे
६१] मारुती विठोबा म्हस्के
६२] भाऊ कोंडीबा भास्कर
६३] धोंडो राघो पुजारी
६४] हृदयसिंग दारजेसिंग
६५] पांडू माहादू अवरीरकर
६६] शंकर विठोबा राणे
६७] विजयकुमार सदाशिव भडेकर
६८] कृष्णाजी गणू शिंदे
६९] रामचंद्र विठ्ठल चौगुले
७०] धोंडू भागू जाधव
७१] रघुनाथ सखाराम बीनगुडे
७२] काशीनाथ गोविंद चिंदरकर
७३] करपैया किरमल देवेंद्र
७४] चुलाराम मुंबराज
७५] बालमोहन
७६] अनंता
७७] गंगाराम विष्णू गुरव
७८] रत्नू गोंदिवरे
७९] सय्यद कासम
८०] भिकाजी दाजी
८१] अनंत गोलतकर
८२] किसन वीरकर
८३] सुखलाल रामलाल बंसकर
८४] पांडूरंग विष्णू वाळके
८५] फुलवरी मगरू
८६] गुलाब कृष्णा खवळे
८७] बाबूराव देवदास पाटील
८८] लक्ष्मण नरहरी थोरात
८९] ठमाबाई विठ्ठल सूर्यभान
९०] गणपत रामा भुते
९१] मुनशी वझीऱअली
९२] दौलतराम मथुरादास
९३] विठ्ठल नारायण चव्हाण
९४] देवजी शिवन राठोड
९५] रावजीभाई डोसाभाई पटेल
९६] होरमसजी करसेटजी
९७] गिरधर हेमचंद लोहार
९८] सत्तू खंडू वाईकर
—नाशिक —
९९] गणपत श्रीधर जोशी
१००] माधव राजाराम तुरे(बेलदार)
— बेळगांव —
१०१] मारुती बेन्नाळकर
१०२] मधूकर बापू बांदेकर
१०३] लक्ष्मण गोविंद गावडे
१०४] महादेव बारीगडी
— निपाणी —
१०५] कमलाबाई मोहिते
— मुंबई—
१०६] सिताराम दुलाजी घाडीगांवकर
१०७] शंकरराव तोरस्कर
१०८] बंडु गोखले
]