कंधार ; प्रतिनिधी
ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी माजी आमदार व खासदार डॉ.भाई केशवरावजी धोंडगे यांच्या शतकोत्सवी वर्षा निमित्त कोरोना महासंकटात श्री.शि.मो.ए.सो.कंधारचे अध्यक्ष तथा माजी जि.प. सदस्य नांदेड प्रा.डॉ.पुरूषोत्तम केशवरावजी धोंडगे यांच्या वतीने कोरोनाग्रस्तांना भाऊचा डबा उपक्रम आधार ठरणार आहे.या उपक्रमाची सुरुवात आज दि.१ मे रोजी पासुन झाली आहे.
ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी माजी आमदार व खासदार आदरणीय डॉ.भाई केशवरावजी धोंडगे यांच्या शतकोत्सव वर्षा निमित्त श्री.शि.मो.ए.सो.कंधारचे अध्यक्ष तथा माजी जि.प. सदस्य नांदेड प्रा.डॉ.पुरूषोत्तम केशवरावजी धोंडगे यांच्या वतीने कंधार लोहा तालुक्यातील कोरोना केअर सेंटर येथील कोरोना बाधित पेशंट व नातेवाईकांना व ग्रामीण रूग्णालय व खाजगी रूग्णालयातील रूग्णांना दररोज ‘भाऊचा डबा” देण्याचा आज दि.1 मे महारष्ट्र दिन व कामगार दिनी शुभारंभ करण्यात आला.
यावेळी प्रा.डॉ.पुरूषोत्तम केशवरावजी धोंडगे अध्यक्ष, श्री शि.मो.ए.सो.ता.कंधार तथा माजी.जि.प.सदस्य नांदेड,माधवराव पा.पेठकर उपाध्यक्ष श्री शि.मो.ए.सो.कंधार,बालाजी पा. जाधव जिल्हाध्यक्ष मराठा सेवा
संघ, माऊली पा. पवार जिल्हाध्यक्ष छावा,गुरूनाथ पा.पेठकर सदस्य श्री शि.मो.ए.सो.कंधार, डॉ पवार साहेब, डॉ धनसडे साहेब, डॉ प्रशांत जाधव साहेब,
डॉ केंद्रे साहेब, डॉ पदमवार साहेब, डॉ पोकले साहेब, सुधाकर पा पवार, प्रा गरूडकर सर, प्रा वाघमारे सर, प्रसाद, आकाश कदम.व इतर मंडळीची यावेळी उपस्थिती होती.