आपण सगळेच भावना शुन्य

.जगात दळवळणाची सोय झपाट्याने वाढली . तसे सर्व जगच एकत्र आले . नावालाच देश राहीले सिमा ठरवल्यात म्हणून देश . जगातील मानवजातीला सिमा राहीलेल्या नाहीत . पूर्वी एखाद्या देशात ज्या घटना गोष्टी घडत त्या कळायला सहा सात वर्ष जात . आता सहा सात सेंकदात जगभरात पसरले जाते . प्रगतीच्या नावाखाली मानवजात एकत्र आली खरी पण त्या बरोबर अनेक संकटं ही जगभर काही तासात काही दिवसात पसरू लागली आहेत. मानव जेवढी प्रगती करतोय ,निसर्गावर मात करण्याचा प्रयत्न करतो तेवेढच आक्राळ विक्राळ संकट मानव जातीवर घोंगावत आहे . मानव जातीवर आक्रमण होत आहे . प्रगतीच्या नावावर मनुष्य कितीही फुशारकी मारत राहीला तरी निसर्गा समोर तो “क’ पदार्थच आहे . एका संकटावर मात करे पर्यंत दुसरं संकट आ वासून मानवजातीसमोर हजर होतो आहे .

. आज हा भयान आजार कोव्हीड १९ हा संपूर्ण जगात धुमाकूळ घालत आहे . जगातील सर्व शासन ,शासकीय यंत्रना व शास्त्रज्ञ जिव तोडून या भयान महामारीपासून मानव जातीची सुटका करण्यासाठी जीवांचे रान करत आहेत . आपल्या देशात आता शेकड्यांने नव्हे हजारानी नव्हे तर लाखात रोगी सापडत आहे . देशाची तसेच राज्याची शासन व्यवस्था आता खडबडून जागी झाली आहे . पण ….

. पण आजही शासन , शासनाची प्रशासन व्यवस्था व विरोधी पक्ष नेते याच्यात एकमत दिसून येत नाही . विरोधी पक्ष फक्त उनीवावर बोट ठेवून बाजूला होतोय . तर प्रशासन हातबल होताना दिसत आहे . आपल्या देशातील सर्व पक्षांनी व त्यांच्या मोठ्या नेत्यांनी एकत्र येवून जर योजना आखली तर या संकटावर निश्चितच मात करता येईल . पण येथील सर्व यंत्रणाच भावना शुन्य झालेली आहे . प्रत्येक पक्ष मीच कसा जनतेचा वाली आहे हे सिद्ध करण्यासाठी धडपडत आहेत पण त्यांची धडपड ही फक्त प्रसिद्धी साठीच ज्यास्त दिसून येते . महामारीत मरणे ही दररोजची घटना आहे व घडत रहाणार आहे याला आपण रोखू शकत नाही अशीच काहीशी भावना सगळ्याची झालेली दिसते . रोजचं मडं त्याला कोण रडं . आता सर्व शासन व्यवस्था व सामान्य जनताही मुकबधीर झालेली आहे . सामन्य जीव जातोय व त्या जाणाऱ्या जीवाचं येथे राजकारण होतो . खाजगी बातमी देणारे सर्व चॅनलही भावना शुन्य झालेले आहेत . तेच ते बातम्या दाखवून सामन्य जनते मध्ये धास्ती पसरवत आहे . हे चांगल्या बातम्या दाखविण्या ऐवजी फक्त जास्तीत जास्त लोकांत दहशत कशी पसरेल अशाच बातम्या दाखवून एक महान कार्य करत आहोत असे कदाचीत त्यांना वाटत असावे किवा भास होत असावा.

शासकीय यंत्रना व शासन हे खरंच जनतेसाठी , त्याचं जीव वाचविण्यासाठी काम करत आहेत ? नियम तयार करणारेच जर नियम मोडत असतील तर तेथील प्रशासन व्यवस्था निश्चितच ढासाळणार . हतबल होणार यात वादच नाही . आता बघा ना या कोरोनाचं भयान आक्राळ विक्राळ रुप तो आक्टोपस सारखं भारताला त्याच्या पायात आवळतोय . जनता जीव मुठीत घेवून पोटापाण्याचा विचार करत घरी बसलीय. पण आपल्या देशातील भावना शुन्य निवडणूक आयोगाने पाच राज्यात निवडणूका घोषित केल्या . केंद्रीय निवडणूक आयुक्त हे स्वंतत्रपणे निर्णय घेवू शकतात . ते सरकाराच्या हातातले बाहुले नाहीत हे माननीय टि एन . शेषण यांनी दाखवून दिलेले आहे . पण स्वंतत्र निर्णय घेणासाठी भावनेपेक्षा कायदा महत्वाचा असतो .हा भयान काळ आहे हे केंद्रीय निवडणुक आयुक्त यांना माहित आहे . हे केंद्र शासनाला माहित आहे .स्थानिक सरकारला माहित आहे . पण निवडणूक आयोगाला कोणीही निवडणूक घेवू नका म्हणून सूचना केली नाही . आता यावर प्रश्न निर्माण होतो की केंद्रीय निवडणूक आयोग एक स्वंतत्र निर्णय घेणारी संस्था आहे . शासन यावर बंधन आनू शकत नाही ? पण हे केंद्रीय निवडवूक आयोग येवढं धुमधडाक्यात निवडवूक घेतली कशी ? यांना सामान्य जनतेशी काहीही देणं घेणं नाहीच का ? शासन सांगते तीन गज लांब रहा . तोंडाला मास्क बांधा . दर काही मिनिटाला सॅनिटायझरने हात धुवा . मग हे नियम फक्त सामन्य जनतेलाच का ? निवडणूक काळात नियम करणारेच नियम मोडताना दिसत होते . बिनधास्तपणे जाहिर सभा घेत होते . तेव्हा तेथे कोरोना नव्हता का ?नियम पाळायची गरज नाही व नव्हती हे देशातील सर्व पक्षांच्या मोठ्या नेत्यांना कळाले नाही का? नियम फक्त गरिबासाठीचअसतात का?

जेथे निवडणूक आयोग शासनाला लगाम घालू शकला असता तेथे त्यांना निवडणूकीत चौखुर उधळायला परवानगी दिली . यांचा परिणाम काय व्हायचं ते झालेलं आहे . सगळ्याच्या भावना बधीर झालेल्या आहेत . देशातील राजकीय पक्षाला सत्ता पाहिजे . प्रशासनातील मोठ्या अधिकाऱ्यांना सेवानिवृती नंतर काही तरी राजकीय बक्षिस पाहिजे . यांच्या राजकीय हव्यासापाई सामन्य जनता , कार्यालयातील कर्मचारी गरिब ,दीनदलित , डॉक्टर , पोलीस,नर्स व शिक्षक याचे जीव जातांना आपण ही बधीर झालेल्या मनाने पहात आहोत . यात जीवंत लोकही भरडले जात आहे .

आज लोकमत मधील बातमी वाचून मन बधीर झालं . निवडणूक आयोग एवढं भावना शुन्य कसं? कोरोना या महामारीने पूर्ण जग व्यापलं आहे . किडी मुंग्यावानी माणसं मरत आहेत तरी केंद्रीय निवडणूक आयोग उत्तर प्रदेशात पंचायत निवडणूका घेत आहे . या निवडणूकीत काम करणारे १३५ शिक्षक व शिक्षक मित्रांचा मृत्यू झालेलं आहे . कुठे गेली संवेदना ? कुठे मेली माणुसकी ?

या कोरोना काळात येवढे जण मरत आहेत की आपण त्यांचा विचार करणंच सोडून दिलं आहे आसे वाटते . आपणही संवेदनहीन संवेदन शुन्य बनलो आहोत . आता भावपूर्ण श्रद्धांजली लिहितानाही कुठे ही मनाला वेदना होत नाही . हळहळ वाटत नाही . कोणाच्याही चेहऱ्यावर ,डोळ्यात दुःख झळकत नाही . असं का व्हावं ?
मोबाईल मुळे जग प्रत्येकांच्या घरात नव्हे हातात आलेलं आहे . कुठे काय घडते हे प्रत्येकांना क्षणोक्षणी कळत आहे . एखादी शिक्षक कोराना मुळे मेला तर ताबडतोब पोस्ट टाकली जाते . एक जीव कमी झाला . अत्यंत हुशार , मनमिळावू , विद्यार्थी प्रिय , समाजकार्यात आवड असलेला सर्व शिक्षक मित्रांना हवाहवासा वाटणारा इंग्रजी व गणित विषयाचं गाढा अभ्यासक आपणास सोडून गेला . भावपूर्ण श्रद्धांजली . व त्या पोस्टच्या खाली त्याच दिवशी दुसरी पोस्ट टाकली जाते : अतिशय बुद्धीमान मनमिळावू विद्यार्थीप्रिय स्कॉलरशीप परीक्षा , नवोदय परीक्षा तज्ज्ञ दोस्तीचा राजा माणुस अमक्या तमक्यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .

.आपण काय करत आहोत याचं ही भान आता आपल्याला राहीलेलं नाही . एकाच वेळी आपण श्रद्धांजली वाहतो व त्याच वेळी वाढदिवस ही साजरा करतो हे योग्य आहे का? आपल्या संवेदनशिल मनाला हे पटते का ? किमान आपण एवढी एक गोष्ट एक पथ्य तरी पाळू या . जेव्हा आपल्या ग्रुप मधील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा कोणाचाही वाढदिवस असेल तर ते आपण साजरा करू नका . वाढदिवस आसणाऱ्याच्या वैयक्तिक फोन क्रमांकावर त्याला शुभेच्छा द्या .

आपण आपलं मन बधीर झालेले नाही व होऊ देवू नका . आजही आपण जागृत आहोत . जागृत राहूत . सामाजिक भान जाण आपल्यात आहे हे आपण दाखवू या . जसे शासन ,प्रशासन , सर्व पक्षांचे नेते व केंद्रीय निवडणूक आयोग यांच्या भावना संवेदना बधीर झालेल्या आहेत त्यांना फक्त कोणा समोर तरी चमकोगिरी करावयाची आहे . तशा आपल्या भावनाना बधीर होवू देवू नका जागे व्हा . स्वतःची काळजी म्हणजे कुटूम्बाची काळजी , कुटुम्बाची काळजी म्हणजे शेजाऱ्यांची काळजी शेजाऱ्यांची काळजी म्हणजे गावाची काळजी ……. घ्या .आसं करत करत आपण सुरक्षित राहू म्हणजेच आपलं देश सुरक्षित राहिल .

M.R.RATHOD

राठोड मोतीराम रुपसिंग

“गोमती सावली ” काळेश्वरनगर , विष्णुपूरी, नांदेड _ ६
९९२२६५२४o७ .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *