लोहा ; प्रतिनिधी-शैलेश ढेबंरे
सन 2020 चे खरीप पिकांची शेतकऱ्यांचे अतिपावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, पण अजून पर्यंत पिक विमा कंपनीकडून कोणतीही नुकसान भरपाई देण्यात आली नाही. नांदेड जिल्ह्याचा पिक विमा तात्काळ जाहीर करा, अन्यथा पुन्हा उपोषणाला बसणार असे प्रहार जनशक्ती पक्षाचे लोहा तालुका उपाध्यक्ष गोविंद पाटील वडजे यांनी प्रतिपादन केले .
परिणामी ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे अशा शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर होऊन त्यांच्या खात्यावर ती जमा झालेला आहे. पण असे शेतकरी खूप आहेत ज्यांनी ऑनलाईन तक्रार दाखल करू शकले नाहीत.याची कारण एक त्यांना ऑनलाईन करण्याची माहित नव्हती, काही शेतकऱ्यांनी तक्रार दाखल करूनही सर्वर प्रॉब्लेम मुळे त्यांची तक्रार दाखल झाली नाही, आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी कृषी विभाग विभागाकडे तक्रारी केलेला आहेत. अशात कंपनीच्या म्हणण्यानुसार ज्या शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या आहेत अशा शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात आलेला आहे परंतु 2020 पूर्वी कोणत्याही वर्षी अशा प्रकारच्या तक्रारी दाखल करण्याची पद्धत नव्हती. परंतु पिक विमा कंपनी शेतकर्या सोबत धोकाधडी करून आणि त्यांना पीक विम्यापासून वंचित ठेवून करोडो रुपये लुटण्याचा कंपनीचा डाव आहे अशात पिक विमा मंजूर न झाल्यास या अगोदर सात दिवसाचे उपोषण केले होते. तेव्हा पिक विमा नांदेड जिल्हा प्रतिनिधी यांनी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात पीक विमा याचा अंतिम निर्णय होईल असे सांगण्यात आले होते.परंतु आज एप्रिल संपत आला असून सुद्धा पिक विमा या संदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे मी पुन्हा उपोषणाला बसेल त्यावेळी जोपर्यंत पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर पडणार नाही तोपर्यंत उठणार नाही मरण आलं तरी बेहत्तर असे मत प्रहार जनशक्ती पक्षाचे लोहा तालुका उपाध्यक्ष गोविंद पाटील वडजे यांचे आहे.