जिल्हा नियोजन समिती सदस्य नवनाथ बापू चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त लोहा येथील कोवीड सेंटर येथील रुग्णांना अंडी वाटप

लोहा ; शैलेश ढेंबरे

कंधार लोहा मतदार संघाचे माजी आमदार रोहीदास चव्हाण यांचे सूपुत्र ,जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा पं.स. सदस्य नवनाथ बापू चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आज शनिवार दि.१ मे महाराष्ट्र दिनी लोहा येथील कोवीड सेंटर येथील रुग्णांना अंडी व फळे वाटप करण्यात आले.

कोरूना सारख्या भयंकर काळामध्ये केवळ वैयक्तिक स्वरुपाचे कार्यक्रम घेवून वाढदिवस साजरा करुन खर्च करण्यापेक्षा समाजाचे ही आपल्याला काही देणं लागतं या हेतुने सामाजिक कार्यकर्ते अमोल चव्हाण, पप्पु पाटील चव्हाण,सुजित चव्हाण यांच्या वतीने अंडी फळे वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला .
यावेळी उपस्थित अमोल चव्हाण, विजय चव्हाण,सतीश निखाते, सुजित चव्हाण आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *