कंधार ; प्रतिनिधी
कंधार तालुक्यातील फुलवळ या गावांवर कोरोनाचे संकट कोसळले असतांना आपल्या जीवाची पर्वा न करता मदतीसाठी बहादरपुरा येथून धावून आलेले कोवीड योद्धा डॉ. राजपूत यांचा अनोखा सन्मान, सत्कार फुलवळ चे माजी सरपंच बालाजी देवकांबळे यांनी डॉ. राजपूत यांच्या घरी जावून दि. २९ एप्रिल २०२१ रोजी स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ, सुरक्षा किट, ग्लोव्हज, मास्क, सॅनिटायझरची ५ लीटरची कैन, देऊन केला आहे.
कंधार तालुक्यातील फुलवळ या गावात पहिल्या लाटेमधे कोरोना हाहाकार केला होता, आजार नवीन होता व गावातील प्रतिष्ठित व उच्चशिक्षित लोकांना कोरोना ची लागण झाली होती, आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या लोकांचा कोरोना ने मृत्यु झाल्याने, गोरगरिब व सर्वसामान्य जनतेसह फुलवळ गाव व परिसर हादरला होता कोणीच जवळ यायला तयार नव्हते, अशा परिस्थितित आमचे मार्गदर्शक डॉ. राजपूत साहेब आमच्या मदतीला धावून आले, सर्वप्रथम पुर्ण फुलवळ गाव सॅनिटायझ करण्यासाठी मार्गदर्शन केले ऐवढेच नव्हेतर सार्वजनिक लाऊडस्पीकर वरुन गावकऱ्यांशी संवाद साधला, मास्क, वारंवार हात धुणे व सामाजिक अंतर या त्रिसूत्री चा अवलंब आणि दिनचर्या व आयुष मंत्रालयाने सुचविलेले कोरोना रोगप्रतिकारशक्ती वाढविणारे होमिओपॅथिक औषध अर्सेनिक अल्बम ३० व त्याचे फायदे सांगून या संकट काळात एक दुसऱ्याचे मनोबल वाढवून एक दुसऱ्याला धिर, मदत व साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले अशी माहीती यावेळी माजी सरपंच देवकांबळे यांनी दिली.
तसेच पुढे बोलताना माजी सरपंच बालाजी देवकांबळे म्हणाले की डॉ. राजपूत साहेब एवढ्या वरच थांबले नाहीत त्यांनी फुलवळ गावाला व तिन वाडी तांड्यांना घरोघरी जाऊन रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी प्रभावी औषध कोणतिही आर्थिक अपेक्षा न ठेवता दिले, ऐव्हढेच नव्हे तर जर एखाद्या गरजू रुग्णाला त्यांच्या दवाखान्यात उपचारासाठी पाठविले तर डॉ. राजपूत साहेब त्यांच्या कडून पैसेही घेत नाहीत मोफत उपचार करून देतात मी पैसे घेतले नाहीत म्हणून त्यांना सांगू नका असे म्हणतात. संकटकाळात आमच्यासाठी, आमच्या गावा साठी धावून आलेल्या डॉ. राजपूत साहेबांना सन्मानित करण्यासाठी आम्ही तिनवेळा बोलावले पण ते पुरस्कार घेण्यासाठी आले नाहीत, या बाबत फोनकरुन विचारणा केली असता डॉ. राजपूत साहेब म्हणाले, आम्ही सन्मान, सत्कार व्हावा यासाठी कधीच कोणतेही काम केले नाही, आणि करत ही नाही व तशी अपेक्षाही आम्ही कोणाकडूनही केली नाही, मला म्हणाले बालाजीराव माझा सत्कार कशासाठी, आपण तर आमचे स्नेही मित्र आहात, तुम्ही व तुमचे गाव संकटात आहे हे कळताच न बोलावता मदतीला धावून आलो व आपले कर्तव्य पार पाडले, मित्र त्यालाच म्हणतात जो न बोलावता धावून येतो, असे ही ते म्हणाले, एक लढवय्या तोंडावर स्पष्ट बोलणारा दिलदार माणुस व आमच्यासाठी आमच्या गावांसाठी असलेला कोवीड योद्धा म्हणून मी, डॉ. राजपूत साहेब यांच्या बहादरपुरा येथील निवासस्थानी त्यांच्या हॉस्पिटल मधे जावून त्यांचा सन्मान, सत्कार करत असल्याचे फुलवळ चे माजी सरपंच बालाजी देवकांबळे यांनी सांगितले.