मुखेड: (दादाराव आगलावे)
कोरोना प्रादुर्भाव च्या वाढत्या काळात पत्रकार ने सुद्धा आपल्या जीवाची पर्वा न करता पत्रकारिता आखडपणे सुरू ठेवली आहे त्यांच्या आरोग्यच्या सुरक्षेसाठी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष व पदाधिकारी यांच्या पुढाकारातून प्रत्येक पत्रकार साठी एक लाख रुपयाचा कोरोना विमा काढून केलेलं अभिनव उपक्रम अतिशय प्रशंसनीय आणि सर्वसाठी प्रेरणादायी आहे. मुखेड तालुका मराठी पत्रकार संघटनेचे या महत्वपूर्ण उपक्रमांचा विविध संघटनांनी याचे अनुकरण करून स्वतः सह कुटुंबाचे आरोग्य सुरक्षित करावे असे आवाहन जागतिक आरोग्य संघटना सर्पदंश व्यवस्थपन सदस्य मुखेड भूषण डॉ. दिलीपराव पुंडे यांनी केले आहे.
मुखेड तालुका मराठी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष ऍड संदीप कामशेट्टे यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून मुखेड येथील सुमारे 26 पत्रकार चा कोरोना सुरक्षा विमा कवच या द्वारे प्रेत्येकाचा एक लाख रु चा विमा काढण्यात आला. या विमा प्रमाणपत्राचे वाटप दि 1 मे रोज शनिवारी महाराष्ट्र दिनी कोरना बाबत च्या सर्व शासकीय सूचना नियमाचे पालन करून तहसील कार्यलयाच्या सभागृहात वितरण करण्यात आले. यावेळी तहसीलदार काशिनाथ पाटील, पोलीस निरीक्षक विलास गोबाडे, मुखेड भूषण डॉ. दिलीपराव पुंडे, पेशकर गुलाब शेख यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ पुंडे म्हणले कोरोनाच्या वाढत्या प्रसाराने सर्वांना चिंतेत टाकले असून स्वतःच्या आरोग्याच्या सुरक्षेतेसाठी व ऐनवेळी उद्भवनारी आर्थिक धावपळ टाळण्यासाठी प्रेत्येकाने आरोग्य विमा काढणे ही काळाची गरज आहे. मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप कामशेट्टे सचिव मेहताब शेख आणि पदाधिकाऱ्यांनी या बिकट काळात आतिशय मोलाचा व स्तुत्य उपक्रम हाती घेऊन एक मह्त्वाचे पाऊल पुढें टाकले आहे. नागरिकांनी कामानिमित्त घराबाहेर पडल्या नंतर स्वतःला असुरक्षित वाटते पण कोव्हिडं च्या काळातसुद्धा सतत कार्य करणारे महसूल कर्मचारी डाॅक्टर्स, पोलीस व पत्रकार मंडळी मात्र घरी गेल्यानंतर घरातील कुटुंबतील सदस्यांना असुरक्षित वाटते करण हे बाहेरून हे कोरोनाचा व्हयरस घरात घेऊन आले का? यांची मनात सतत भीती त्याना वाटत असते. यामुळे हे वास्तव ओळखून मुखेड तालुका मराठी पत्रकार संघटनेच्या अध्यक्ष व पदाधिकारी यांनी पत्रकार संघाच्या सदस्य चा विमा उतरविण्याचा निर्णय घेऊन अमलात आणला आहे. पत्रकाराने स्वतः साठी काढलेला विम्याचे रूपांतर कौटुंबिक विम्यात करावे व स्वतः सह कुटूंब पुर्नपणे सुरक्षित करावे, एनेवेळी उधभवणारे आर्थीक ताणतणाव टाळावे कोव्होड चा वेगाने होणारे प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकाने सतर्क राहावे या आजरकडे दुर्लक्ष करू नये लक्षणे दिसताच चाचणी करवून घायवे नागरिक मात्र कर्करोग च्या उपचार साठी प्रतिसाद देतात पुढे येतात मात्र कोरोना च्या चाचणी चे निदान करण्यासाठी पुढाकार घेत नाहीत ही खणत आहे संशयित रुग्ण स कोरोना चाचणी करण्यास सांगितले असता ते मात्र तपासणीसाठी डॉकटर्स बदलत आहेत पण चाचणी करवून न घेता घरात राहून अत्यवस्थ गंभीर होत आहेत असे निदर्शनास आले अशी खंत डॉ पुंडे यांनी यावेळी विषद केली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव काळात देशातील 154 पत्रकार ने पत्रकारिता करताना स्वतःचा जीव गमावला आहे त्यामुळे त्यांचे कुटूंबीय उघडयावर आले आहेत त्यामुळे पत्रकाराना फ्रंट लायनर कोव्हिडं योद्धे म्हणून शासनने विविध योजनांचा लाभ देऊन मदत करावी अशी मागणी यावेळी पत्रकार कडून करण्यात आली कोव्हिंड ने जीव गमावलेले पत्रकारण यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुखेड तालुका पत्रकार संघटचे अध्यक्ष ऍड संदीप कामशेट्टे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, सध्याचा कोव्हिडं चा काळ हा अत्यन्त धोकादायक ठरत असल्याने व ग्रामीण पत्रकारांना कुठलेही संरक्षण नसल्याने पत्रकार ना कोरोना विमा सुरक्षा कवच उपक्रम राबवून पत्रकार साठी संकट काळी होणारी धावपळ लक्षात घेता विमा द्वारे आर्थिक तरतूद केली विमा संरक्षण मूळे लाभ मिळत असला तरी प्रत्येक ने शासकीय सूचना नियमाचे पालन करावे आपली व आपल्या कुटुंबातील सदस्याच्या आरोग्यची काळजी घ्यावी असे आवाहन केले. तसेच पत्रकारांच्या त्यांच्या कुटूंबीयांच्या सुरक्षिततेसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी एक विशेष शिबिर आयोजित करावे अशी मागणी केली. पत्रकारांसाठी पत्रकार भवनाचा प्रश्न मार्गी लावावा म्हणून महसूल प्रशासनने जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणीही यावेळी केली. अध्यक्षीय समारोप करताना तहसीलदार काशिनाथ पाटील यांनी सांगितले की मुखेड तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी विमा संरक्षण चा राबविलेल्या उपक्रम उल्लेखनीय असून त्याची प्रशंसा करावी तितकी कमी असल्याचे सांगितले. आगामी काळात पत्रकारना कोव्हिडं प्रतिबंधक लसीकरण साठी प्रथम प्रधान्य देणार आहे पत्रकार भवन चा प्रश्न मार्गी लागाव म्हणून भूखंड हस्तांतर करण्याबाबत जिल्हा प्रशासन कडे पाठपुरावा करणार आहे पत्रकारांनी स्वतःच्या आरोग्यची काळजी घेऊन अधिक जोखीम न स्वीकारता वृत्तकन करावे आपल्या वर जबाबदारी असून कुटूंबीय चा विचार करावा असे सांगितले सर्वनो शासकीय नियम सूचना पाळावेत कोरोना चा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी ही साखळी तोंडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन केले. पोलीस निरीक्षक विलास गोंबाडे, ऍड आशिष कुलकर्णी, राजेश बंडे, हासिनोद्दीन शेख, ज्ञानेश्वर डोईजड यांनी मनोगत व्यक्त करून कोव्होड काळात अनुभव आणि वास्तव व्यक्त केले.
सूत्र संचलन जयभीम सोनकांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन पत्रकार संघटनेचे सचिव मेहताब शेख यांनी आभार मानले. यावेळी उपस्थित पत्रकारांना मान्यवरांच्या हस्ते विमा पॉलिसी चे वाटप करण्यात आले.