कंधार प्रतिनीधी
नांदेड जिल्हा माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड हे सेवानिवृत झाल्यापासुन सामाजीक व लोकोपयोगी उपक्रम राबवून राबवत आहेत. आज पर्यंत त्यांनी आपला वाढदिवस सिमेवरच साजरा केला. या वर्षी कोरोनाचे संकट असल्याने माजी सैनिक संघटनेच्या वतिने कंधार कोवीड सेंटर येथे आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सॅनिटायझर,हैंड ग्लोज,मास्क व रुग्णांसाठी फळे, बिस्किट व मिनरल वाटर आदींची भेट देऊन वाढदिवस साजरा केला.
बालाजी चुकवावाड हे 31जानेवारी 2020रोजी17वर्ष अखंडीत सेवा करुन सेवा निवृत होऊन जन्मभुमीत परतले तेंव्हा गावातील नागरीक वगळता यांना कोन्हीच ओळख नव्हत.23मार्च 2020रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लाॕकडाऊन करण्यात आले. त्यावेळी दे पोलीसांनवरचा ताण कमी झाला पाहीजे ही भुमीका घेऊन पोलिस मित्र बनून त्यांनी लाॕकडाऊनच्या संकटमय काळात पोलिसांच्या खाद्याला खांदा लावुन काम करुन सामाजिक बांधीलकी जपली. आर्मीत काम केले असल्यामुळे अंगात आक्रमक पणा असल्याने बालाजी चुकलवाड यांची दहशत निर्माण झाली.विनाकारण रस्त्याने फिरणाऱ्या लोकांना बालाजी चुकुलवाड यांची भिती निर्माण झाली.या माध्यमातुन कोरोना सारख्या महामारीत देश सेवा म्हणून त्यांनी कर्तव्य पार पाडुन सामाजिक बांधीलकी जपली. हे रत असतानाच सैनिकांच्या हिताचे प्रश्न आक्रमक सोडवुन जिल्ह्यात नावलौकिक झाले.त्यांनी या दोन वर्षात विविध माध्यमातुन सामाजिक काम केले.
यावर्षी कोरोनाची दुसरी लाट आली आसतानाही घरी न राहता पोलीस प्रशासनाला मदत म्हणून माजी सैनिकांना सोबत घेऊन काम करत आहेत.आज त्यांचा 38वाढदिवस असल्याने माणुसी धर्म म्हणून माजी सैनिक संघटना कंधारच्या वतिने कंधार कोविड सेंटरला सॅनिटायझर,मास्क, फळे व मिनरल वॉटर ची भेट दिली .