कंधार ; ता.प्र.
मौ.घोडज ता.कंधार येथिल ग्रामपंचायतीवर आमदार श्यामसुंदर शिंदे यांचे पिए तथा कंधार तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती यांची सत्ता आहे.सत्येचा गैरवापर करुन ग्रामपंचायत हद्दीत असणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सभागृहाच्या मोकळ्या जागेवर मराठा समाजातील काहीजण संगणमत करुन अतिक्रमण करत असल्याची माहीती मामा मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष मारोती मामा गायकवाड यांनी दि.३० एप्रिल रोजी दिली.
याबाबत सविस्तर असे की मौ.घोडज येथे ग्रामपंचायत हद्दीत साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांचा अर्धाकृती पुतळा आहे.त्याला लागुनच सांस्कृतिक सभागृहासाठी मोकळी जागा आहे.सदरील जागा ग्रामपंचायतीच्या नमुना नंबर आठ नुसार सुमारे तिन हजार चौरस फुट मालमत्ता क्रमांक ४८१ रजिस्टर क्रमाक ५१४ नुसार नोंद आहे.
सदरील जागा सन १९९९ मध्ये माणिक शंकरराव देशमुख यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी दान केली होती.
परंतु दि.२७ एप्रिल रोजी येथिल शेषाबाई डफडे,रामराव मिरकुटे,दौलत मिरकुटे,रामू मारोती डफडे हे मराठा समाजातील लोक जातीवाचक शिवीगाळ व मातंग समाजातील बांधवावर मारहान करत साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जागेवर अतिक्रमण करत आहेत.त्यानुसार समस्त मातंग समाजातील समाज बांधवानी दि.२७ एप्रिल रोजी तहसिलदार कंधार यांना निवेदन देवून मागासवर्गीय लोकांना न्याय देण्याची मागणी केली आहे.
त्यानुसार कंधार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संग्राम जाधव यांनी घटनास्थळी भेट देवून परीस्थीचा आढावा घेत मातंग व मराठा समाजातील लोकांना समजावण्याचा प्रयत्न करत घोडज येथे अघोषीत कर्फ्यू लागला होता.
परंतु सदरील अतिक्रमण करणारे श्रीमती शेषाबाई मारोती डफडे,रामराव केरबा मिरकुटे, व त्यांचा मुलगा दौलत रामराव मिरकुटे आणि रामू मारोती हे आमदार श्यामसुंदर शिंदे यांचे पिए तथा कंधार तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती ज्ञानेश्वर चोंडे हे सत्येचा गैरवापर करुन ग्रामपंचायत हद्दीत असणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सभागृहाच्या मोकळ्या जागीत अतिक्रमण साठी प्रोत्साहन देत त्यांना पाठींबा देत असल्याचा आरोप दि.३० एप्रिल रोजी मामा मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष मारोतीमामा गायकवाड यांनी केला आहे.
तर यावेळी माजी सरपंच आनंदा घोडजकर ,नागेश घोडजकर ,साहेबराव घोडजकर यांनी सदरील जागा साहित्यरत्न अण्णा भाऊसाठे स्मारकासाठीच्या सभागृहासाठी असल्याचे सांगून सन २०१४ मध्ये वरील अतिक्रमण धारकांनी असेच अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता.सदरील प्रकरण जिल्हाधिकारी यांच्या कडे गेले होते तसेच जिल्हाधिका-यांनी तत्कालीन तहसिलदार यांना सरदील प्रकरण निकाली लावण्याच्या सुचना दिल्या होत्या परंतु राजकारण करत ते तसेच राहीले .
असे वारंवार अतिक्रमणाचा प्रयत्न करुन मातंग व मराठा समाजात तेढ निर्माण करत असल्याने भविष्यात दंगली होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून न्याय निवाडा करण्याची मागणी घोडज येथिल मातंग समाजाच्या वतीने तहसिलदार कंधार यांना केली आहे.
