सुभाष चोपडे यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती

कुरुळा ; विठ्ठल चिवडे

कुरुळा पोलीस चौकीवर कार्यरत असलेले पोलीस हवालदार सुभाष चोपडे यांची सेवाजेष्ठतेनुसार सहायक पोलिस उपनिरीक्षक पदावर नुकतीच पदोन्नती झाली असून सर्व स्तरातून त्यांच अभिनंदन होत आहे.

सुभाष चोपडे हे मागील एक वर्षापासून कुरुळा पोलीस चौकीत पोलीस अंमलदार म्हणून कार्यरत आहेत. कर्तव्यावर त्यांनी अवैध दारूविक्री,मटका यांना आळा बसवत वचक निर्माण केली असून गोरगरीब घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.कोरोनाकाळातही कर्तव्य निभावत चोपडे यांनी निराधार वयोवृद्धाला जीवनावश्यक भेट देऊन खकितील ममत्वभाव जागविला आहे.नेहमीच समाजकार्याची आवड असणाऱ्या सुभाष चोपडे यांना ता.३ मे रोजी कंधार पोलीस स्टेशन येथे प्र.पोलीस निरीक्षक संग्राम जाधव,पी एस आय विठ्ठल गंगलवाड यांच्या उपस्थितीत एक स्टार व फित लावून पदभार देण्यात आला.नांदेड पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या ता.३० एप्रिल २०२१ च्या आदेशान्वये सेवाजेष्ठतेनुसार चोपडे यांना ही पदोन्नती मिळाली असून त्यांना कंधार पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *