लोहा : जि प शिक्षक जिल्हांतर्गत बदल्या सुधारित धोरणाचा दिनांक- 07 एप्रिल 2021 चा शासन निर्णय तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मा. प्रशांत दिग्रसकर यांच्या निर्देशानुसार शिक्षण विभाग, पंचायत समिती, लोहाच्या वतीने विशेष संवर्ग- 1 प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया दिनांक- 03 मे 2021 रोजी तहसील सभागृह, प्रशासकीय इमारत, लोहा येथे सुरळीतपणे, शांततेत पार पडली.
संदर्भिय शासन निर्णयानुसार, विशेष संवर्ग- 1 प्रमाणपत्र पडताळणीसाठी गठीत त्रिसदस्यीय समितीत गट विकास अधिकारी श्री प्रकाश जोंधळे, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ प्रविण मुंडे, गट शिक्षणाधिकारी रविंद्र सोनटक्के यांचा समावेश होता.
कोरोना संकटकाळात संवर्ग- 1 प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया सुयोग्य पद्धतीने संपन्न व्हावी, या उद्देशाने योग्य ती खबरदारी घेण्यात आली होती. सदर पडताळणी प्रक्रियेसाठी 53+ चे शिक्षक वगळता तालुक्यातून 80 शिक्षकांचे अर्ज प्राप्त होते. त्यापैकी 75 शिक्षक उपस्थित राहिले. उपस्थित शिक्षकांपैकी 68 शिक्षकांना त्यांच्या मूळ प्रमाणपत्र पडताळणी आधारे समितीने पात्र घोषित केले.
यावेळी पंचायत समितीचे सभापती मा. आनंदराव पाटील शिंदे, उपसभापती मा. नरेंद्र गायकवाड यांनी भेट देऊन समाधान व्यक्त केले. पडताळणी प्रक्रियेच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक गट विकास अधिकारी मा. उमाकांत तोटावाड, विस्तार अधिकारी (आरोग्य) श्री कुलकर्णी, शिक्षण विस्तार अधिकारी श्री बी पी गुट्टे, केंद्र प्रमुख डी आर शिंदे, सहशिक्षक दिलीप सोनवळे, साधन व्यक्ती रामदास कस्तुरे, विशेष तज्ञ रफिक दौलताबादी आदींनी परिश्रम घेतले.