रघुनाथ नगर कंधार येथील विकास कामासाठी नगरपालीकेने आरक्षण उठवावे – संयुक्त ग्रुप महाराष्ट्र राज्य चे मुख्याधिका-यांना निवेदन

कंधार ; प्रतिनिधी

कंधार शहरातील रघुनाथ नगर येथे पाईप लाईन, विद्युत कनेक्शन, ये – जा करण्यासाठी रस्ते व येथील डी.आर.डी (दारिद्रय रेषेखालील) नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ व इतर विकास कामे होवून नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी कंधार नगरपालीकेच्या वतिने असलेले जमिनीवरील आरक्षण त्वरीत हटवून विकास कामे करावी अशी मागणी दि.४ मे रोजी साईनाथ भगवानराव मळगे संस्थापक अध्यक्ष संयुक्त ग्रुप महाराष्ट्र राज्य च्या नेतृत्वाखाली येथिल नागरीकांच्या वतीने नगरपालीका मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.

शहरातील रघुनाथ नगर ही दाट वस्ती असलेले नगर आहे परंतु भौतीक सुविधा बाबत मागे आहे.रस्ते ,रस्तावरील विद्यत व पाण्याचा प्रश्न आसह अनेक प्रश्न येथिल जमीनीवरील आरक्षण असल्याने कोणतेही विकासकामे होत नसल्याने येथिल नागरीकांन्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो .या सर्व बाबीचा विचार करुन येथिल नगरवाशीयांच्या समस्या सोडवण्यासाठी साईनाथ भगवानराव मळगे संस्थापक अध्यक्ष संयुक्त ग्रुप महाराष्ट्र राज्यच्या वतीने नगरपालीका मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून विकासकामासाठी विनंती करण्यात आली आहे.या निवेदनावर नगरातील किरण मोरे ,दयानंद मळगे ,परमेश्वर देव कांबळे, केरबा कांबळे, संतोष नवघरे, विनोद कांबळे, अनिल लोंढे ,माधव ठाकूर ,कल्याण देवकांबळे, शाहरुख पठाण, किरण भिसे, पुनम दीपक मोरे ,द्रोपदी मोरे, संदीप नवघरे ,नितीन नोकरी, अरविंद नवघरे, नितीन नवघरे, उत्तम नवघरे, मनोज कांबळे ,गजानन कपाळे आदींच्या स्वाक्षरी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *