खरे कोव्हीड योद्धे … राष्ट्रवादी कॉग्रेस शहराध्यक्ष तथा कंधार तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राजकुमार केकाटे व आमच्या भगीनी सौ.अम्रपालीताई यांनी लॉकडाऊन काळात दीन दुबळ्यांना आन्न दान अविरतपणे केले.या वेळी अन्नदान वाटप करताना आपले घर सर्वांसाठी खुले ठेवले .
कोरोना काळात कोन्ही घरी येण्यासाठी कोन्ही तयार नाही आणि कोन्ही नको अशी परीस्थीती असताना या केकाटे दांपत्यांनी आपले घर सर्वासाठी खुलेच ठेवले..राष्ट्रवादी शहराध्यक्ष राजकुमार केकाटे यांच्या राजकीय ,सामाजिक वाटचालीत सामाजिक कार्यकर्त्या सौ.अम्रपाली केकाटेताई यांचा सिंहाचा वाटा आहे.
राजकीय वारसा नसतानाही फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा घेवून समाजातील गोर गरीबांचे प्रश्न सोडवणारे कार्यक्रते म्हणून राजकुमार केकाटे यांची ओळख आहे.ग्रामिण भागातील एखादा गरजवंत काम घेवून आला तर ते निश्चितपणे काम होणारच वेळप्रसंगी सर्वसामान्य मानसाला न्याय मिळावा म्हणून प्रशासनाला भांडण्यासाठी ते मागे पुढे पाहत नाहीत.
कंधार तालुक्यात माजी आमदार तथा शेतकरी नेते शंकर अण्णा धोंडगे यांना आदर्श माणून दिलीपदादा धोंडगे ,शिवराज धोंडगे ,ॲड.विजय धोंडगे यासह राष्ट्रवादीचे सर्व कार्यक्रते यांच्या सहकार्याने आज कंधार शहरासह तालुक्यात राष्ट्रवादी परीवाराने दिलेली जबाबदारी केकाटे परीवार निभावत आहे.
वर्षातून घरी लहानसहान ,छोटामोठा कार्यक्रम असो त्यानिमिताने घरी पत्रकार,नगरसेवक ,कार्यक्रते ,समाजबांधव यांची नेहमीच येजा आसते .त्या सर्वाचे आदरआतिथ्य केल्याशिवाय केकाटे दांपत्य जाऊ देत नाहीत.
राष्ट्रवादी कॉग्रेस शहराध्यक्ष तथा कंधार तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राजकुमार केकाटे व आमच्या भगीनी सौ.अम्रपालीताई यांना सर्वच क्षेत्रात भरभरुन यश मिळावे
व आई पार्वतीबाई केकाटे,मुलगी कु.राघीनी ,मुलगा साईनाथ,रोहीत या सर्वाचे आरोग्य चांगले राहावे .
खरे कोव्हीड योद्धे… राजकुमार केकाटे व आम्रपाली केकाटे आपणास लग्नदिवसाच्या खुप खूप शुभेच्छा