नांदेड, ४ मे २०२१ – महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातल्या वाढत्या कोव्हिड – १९ च्या प्रादुर्भावाला सामोरे जाण्यासाठी सज्ज अशा ५० फोर्स ट्रॅक्स रुग्णवाहिका जिल्ह्याचे पालकमंत्री श्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते १ मे या महाराष्ट्रदिनी कार्यरत करण्यात आल्या. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री विपीन इटणकर , जिल्ह्या परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) श्रीमती मंगरानी अंबुलगेकर, आमदार अमर राजूरकर आणि श्यामसुंदर शिंदे यांच्या उपस्थितीत नांदेड जिल्हा परिषदेला सुपूर्त केल्या.
फोर्स ट्रॅक्स रुग्णवाहिका भारतभर रुग्णांना उपचारासाठी घेऊन जाण्याकरिता अत्यंत दणकट आणि भरवशाच्या तसेच कोणत्याही प्रकारच्या रस्त्यांवर स्थिर चालणा-या म्हणून मान्य झाल्या आहेत. फोर्स मोटर्स च्या कारखान्यात तयार होणा-या या रुग्णवाहिका आधुनिक रचनेच्या आहेत आणि त्याची सर्व अंतर्गत रचना नव्याने करण्यात आलेली आहे.
रुग्णवाहिका म्हणून वापर करण्यासाठीचे सर्व निकष या नव्या ट्रॅक्स पूर्ण करतात. राज्यांचे आरोग्य विभाग, सरकारी रुग्णालये, आपत्कालीन सेवा पुरविणा-या संस्था आणि कॉर्पोरेट क्षेत्र या सगळ्यांसाठीच त्या त्यांच्या उत्तम काम, विश्वासार्हता आणि टिकाऊपणा या गुणांमुळे सुयोग्य आहेत. या वाहनांसाठी ३ वर्षे किंवा ३ लाख किलोमीटर या वाहनक्षेत्रातील सर्वोत्कृष्ट अटी लागू आहेत.
फोर्स मोटर्स च्या सेल्स आणि मार्केटिंग विभागाचे प्रमुख श्री आशुतोष खोसला यावेळी म्हणाले, “नांदेड जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील रुग्णांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी आमच्या ट्रॅक्स रुग्णवाहिकांवर जो विश्वास ठेवला त्याचा आम्हाला अभिमान आहे. कोव्हिड -१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्यसेवेला बळकटी देण्याच्या या उदात्त कार्यात आमचा सहभाग असल्याचे आम्हाला समाधान आहे.”
फोर्स मोटर्स विषयी :
श्री नवलमल फिरोदिया यांनी सर्वोत्तम उपलब्ध तंत्रज्ञान वापरून सर्वसामान्यांना कमी खर्चाची, भरवशाची, कार्यक्षम आणि किफायती मालवाहतूक उपलब्ध व्हावी या हेतूने १९५८ मध्ये फोर्स मोटर्स ची स्थापना केली. आज फोर्स मोटर्स वाहनांचे सुटे भाग, वाहने आणि कृषि क्षेत्रासाठी ट्रॅक्टर या सर्वांचे उत्पादन करणारी एक परिपूर्ण वाहन उत्पादक कंपनी आहे. कंपनीची ट्रॅव्हलर आणि ट्रॅक्स ही वाहने आपापल्या श्रेणीत आघाडीची ठरली आहेत. फोर्स मोटर्स ही अग्रणी कंपनी असलेल्या या ग्रुप च्या १५ कंपन्या आणि १४००० कर्मचा-यांच्या उद्योगसमूहाचे नेतृत्व यांच्याकडे आहे.
मर्सिडीज आणि बीएमडब्ल्यू या दोन्ही कंपन्यांच्या कार आणि एसयूव्ही साठी इंजिने तयार करणारी फोर्स मोटर्स ही एकमेव कंपनी आहे. २०१८ मध्ये कंपनीने रोल्स रॉयस पॉवर सिस्टिम्स एजी बरोबर संयुक्त कंपनी सुरु केली आणि रोल्स रॉयस च्या १०/१२ सिलिंडर च्या एस १६०० या वीजनिर्मिती साठी तसेच रेल्वे साठी वापरात येणा-या इंजिनांची निर्मिती सुरु केली आहे.