धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली साडेतीनशे जेवणाचे डबे वितरित ; एक हात मदतीचा उपक्रम

नांदेड ; प्रतिनिधी

लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रल आणि लॉयन्स क्लब नांदेड अन्नपूर्णा यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ” एक हात मदतीचा” या उपक्रमांतर्गत विसाव्या दिवशी संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली साडेतीनशे जेवणाचे डबे वितरित करण्यात आले.

शंभर टक्के लोकसहभागातून सुरू असलेल्या या उपक्रमात मंगळवारी सत्यव्रत जिंदम व परिवारातर्फे कै. राधाबाई शिवराम जिंदम यांच्या स्मरणार्थ तिनशे गरजूंना गोड जेवण देण्यात आले. याशिवाय ज्येष्ठ भाजपा महिला पदाधिकारी सौ. धनश्री व दत्तात्रय देव यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पन्नास डबे वितरित करण्यात आले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रलचे अध्यक्ष लॉ. संजय अग्रवाल, सचिव लॉ.ॲड. उमेश मेगदे, कोषाध्यक्ष लॉ. सुनील साबू, प्रोजेक्टर चेअरमन
लॉ.अरुणकुमार काबरा यांच्यासह
लॉयन्स क्लब नांदेड अन्नपूर्णा चे
अध्यक्ष लॉ. नागेश शेट्टी,सचिव
लॉ.धनराजसिंह ठाकूर,कोषाध्यक्ष
लॉ. अनिल चिद्रावार,प्रोजेक्टर चेअरमन राजेशसिंह ठाकूर ,मन्मथ स्वामी हे परिश्रम घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *