; (शेख मुर्तूजा यांच्या वतीने श्रद्धांजली )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोलेगाव वाडी केंद्र गोलेगाव येथे कार्यरत असणारे एन डी देशमुख सर मागील काही दिवसांपासून हायद्राबाद येथील दवाखान्यात उपचार घेत होते कांहीं दिवसांनंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे असी चर्चा होती त्यांना नांदेड येथील रुग्णालयात हायद्राबादहून दाखल करण्यात आले होते परंतु आज अचानक त्यांचे दुःखद निधन झाल्याची बातमी ऐकताच मन्न सुन्न झाले देव आमच्या एवढा का कोपलास रे…
देशमुख सर म्हणजे अतिशय नम्र विनयशील माणुसकीचा जिवंत झरा माणुस माझी प्रथम नेमणूक १९९५ त्या काळात आमची शाळा पानभोसी केंद्रात काही काळ होती त्यावेळी देशमुख सर पानभोसी केंद्रिय शाळेत कार्यरत होते तेंव्हा पासून आमची ओळख नंतर कें प्रा शा कन्या लोहा येथे पण आम्ही एकाच केंद्रात होतो सरांचा बराच सहवास मला लाभला मी इयत्ता पाचवीचा इंग्रजी विषयाचा घेतलेला पाठ नेहमी भेट झाली की म्हणायचे मुर्तुज सर तूमची इंग्रजी खुप चांगली आहे मला नेहमीच प्रोत्साहित करायचे मला तर वाटतं देशमुख सरांनी आजपर्यंत कोणासोबत भांडण तर सोडुन द्या पण कोणाला अरे सूद्धा म्हणले नसतील कोणचेही मन दुखावले नसतील अतिशय प्रेमळ स्वभावाचे देशमुख सर नेहमी मला चांगल्या कामाबद्दल आवर्जून भेट झाल्यावर अभिनंदन करायचे माझे काही चुकले तर मला एकांतात बोलून भावासारखे मला समजून सांगायचे सर तूमचा चुकालय तूम्ही चांगले आहात खरचं देशमुख सर माझे जेष्ठ बंधूतूल्य मार्गदर्शक होते नक्कीच मी आज एका जेष्ठ बंधूतूल्य मार्गदर्शक गमावला ओल्याचिंब अश्रूनी सरांना आदरांजली……🙏