आमदार डॉक्टर तुषार राठोड यांच्या हस्ते नवीन रुग्णवाहिकेचे लोकार्पण

मुखेड ; प्रतिनिधी


केंद्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन निधीतून खरेदी करण्यात आलेल्या नवीन रुग्णवाहिका मुखेड कंधार तालुक्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांना देण्यात आले आहेत यासंबंधीची माहिती आमदार डॉक्टर तुषार राठोड यांनी यापूर्वीच दिली होती
आज प्राथमिक आरोग्य केंद्र पेठवडज तालुका कंधार येथे व प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव येथे या रुग्णवाहिकेचे आमदार डॉक्टर तुषार राठोड यांच्या हस्ते उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले.

त्यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र पेठवडज येथील कार्यक्रमात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर योगेश धुळेवाढ पेठवडज पंचायत समिती सदस्य पंजाबराव पाटील वडजे नारायणराव गायकवाड श्याम जोशी गिरधारी केंद्रे संजय ठाकरे खुशाल राव राजे दत्ता किन्नवाढ गोविंद केंद्रे व्यंकटराव पांढरे नारायण चमकुरे, राजु घोडके संगमेश्वर देवकते सरपंच मुजावर गजानन साखरे इत्यादी प्रतिष्ठित नागरिक ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य पंचायत समिती सदस्य उपस्थित होते
प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव येथील कार्यक्रमात प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव कथा प्राथमिक आरोग्य केंद्र जांब येथील रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले त्यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव चे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बालाजी गरुडकर प्राथमिक आरोग्य जांब चे वैद्यकीय अधिकारी मुखेड पंचायत समितीचे सभापती लक्ष्मणराव पाटील खैरकेकर भाजपा तालुका उपाध्यक्ष गणेश पाटील जाधव नारायण चमकुरे संगमेश्वर देवकते सरपंच मुजावर गजानन साखरे इत्यादी प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *