कंधार ; प्रतिनिधी
माजी मुख्याध्यापक खंडेराव पांडागळे यांच्या वाढदिवसाचे निमित्ताने दि.४ मे रोजी कंधार येथिल सेंटर येथिल वैद्यकीय अधिकारी ,नर्स ,व आरोग्य कर्माचारी यांना मॉस्क,हँन्डग्लोज,व फेस शिल्ड आणि रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.
फुलवळ येथिल महात्मा बसवेश्वर विद्यालय येथे मुख्याध्यापक पदावरुन सेवा निवृत्त झालेले खंडेराव पांडागळे हे विद्यार्थी प्रिय शिस्तीचे होते.आपल्या सेवेत अनेक समाजउपयोगी कार्यक्रम त्यांनी घेवून वेळोवेळी विद्यार्थी ,पालक आणि शिक्षकांचे मार्गदर्शन करुन मानोबल वाढवले आहे.
कोरोना महामारी असताना आपला दि.४ मे रोजीचा वाढदिवस साजरा करणे उचीत नव्हे .ख-याअर्थाने जे वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर ,नर्स व आरोग्य कर्मचारी आपला जिव मुठीत घेवून देशसेवा करत कोरोनाला हरवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.त्यांना आपण मदत करावी ही भावना त्यांनी आपला मुलगा अजिंक्य पांडागळे यांना बोलुन दाखवली .तात्काळ अजिंक्य यांनी ही गोष्ट अमलात आणली .
कंधार येथिल सेंटर येथिल वैद्यकीय अधिकारी ,नर्स ,व आरोग्य कर्माचारी यांना मॉस्क,हँन्डग्लोज,व फेस शिल्ड आणि रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.
यावेळी कंधार काॅग्रेस कमिटीचे ता.अध्यक्ष बालाजी माधवराव पा.पांडागळे साहेब शहर अध्यक्ष हमीद सुलेमान दत्ता पा. शिंदे हाळदेकर बाळासाहेब पवार सतिश नळगे अजय मोरे सतिश देवकत्ते स्वप्निल परोडवाड व कोविड सेंटर येथील डाॅक्टर नर्स व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.