कंधार ; प्रतिनिधी
पुणे येथे इंजिनिअर असलेली कु गितांजली नागनाथ देशमुख हिने वडीलास अग्नी देऊन अंत्यसंस्कार केले.नागनाथ दौलतराव देशमुख यांचे दि.४ मे रोजी दुःखद निधन झालं . मृत्युसमयी त्यांचे वय 49 वर्षे होते.
जि. प .प्रा .शा. गोलेगाववाडी संकुल गोलेगाव ता. लोहा येथे ते शिक्षक कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, तीन भाऊ असा मोठा परिवार असून त्यांच्यावर कंधार येथील स्मशानभूमीत दि.४मे रोजी ठीक 8:30 pm. वाजता पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने कंधार लोहा दोन्ही तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.