कंधार ; प्रतिनिधी
आज दि.५ मे हाळदा ता.कंधार येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत पाणलोट विकासकामाचे भूमिपूजन सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना आशाताई म्हणाल्या की,जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या योजनांचा फायदा घ्यावा व अशा पाणलोट विकास कामाच्या माध्यमातून शेतीच्या पाण्याच्या समस्या कमी होतील व याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना फायदा होईल असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे यांनी केले.
यावेळी तालुका कृषी अधिकारी रमेशजी देशमुख यांनी विविध कृषी योजना,बियाणे संदर्भात सविस्तर मार्गदर्शन शेतकऱ्यांना करण्यात आले .
यावेळी रोहीत पा. शिंदे,प.स.सदस्य सुधाकर सूर्यवंशी,मंडळ अधिकारी रमाकांत भुरे, सरपंच प्र.हणमंत हाळदेकर,उपसरपंच साहेबराव वसुरे,पोलीस पाटील विलास बुरपल्ले,पंजाबराव शिंदे,सुभाषराव शिंदे,चंद्रकांत अंडीलवाड,रावसाहेब शिंदे,धनाजी मामा ढगे,विश्वास कदम,विजय काकडे,कृषी सहायक काकडे,अनिल शिंदे,प्रदीप ढगे सह शेतकरी बांधव सामाजिक अंतराचे पालन करत उपस्थित होते.