लोहा ; प्रतिनिधी
लोहा येथिल
येथील पोलीस ठाण्यात नव्याने पोलीस निरीक्षक म्हणून संतोष तांबे हे रुजू झाले, मराठी पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा आज गुरुवार दि.६ मे रोजी सत्कार करण्यात आला.
नुकतेच पोलीस निरीक्षक जायभाये सेवानिवृत्त झाल्याने रिक्त जागेवर पोलीस निरीक्षक म्हणून संतोष तांबे हे रुजू झाले आहेत. मराठी पत्रकार संघाच्या पुढाकारातून पोलीस स्टेशन लोहा येथे जावून सत्कार करण्यात आला.
यावेळी पत्रकार संघाचे रत्नाकर महाबळे, युनूस शेख,शेख अहेमद,विलास सावळे, इमाम लदाफ, गोविंद कदम, शिवाजी पांचाळ,शाम पाटील नळगे आदीची उपस्थिती होती.