फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )
कंधार तालुक्यातील फुलवळ सर्कल मध्ये असलेल्या बोरी( बु) पुर्नवसन गावातील लोकानी ग्रा.प.सेवक दहा दहा दिवस सार्वजनिक नळ योजनेला पाणी न सोडता दारूपिउन असिल शिवगाळ करूण धमकि देत असल्याची तक्रार बोरी बु येथील लोकानी मु.का.अ.नांदेड ,जि.प.अध्यक्ष ,सह मु.का.अ.पचायत विभाग व गटविकास अधिकारी प.स. कंधार येथे केली आहे.
ग्रा.प.का.बोरी (बु.) सेवक हरी चंदर गंगावणे यांना पिण्यासाठी व सांडपाण्यासाठी वापरण्यासाठी पाणी सोडा म्हटले की तो दारू पिऊन रस्ताने अस्सील शिविगाळ करून गावातील लोकाना अपमाणित करीत तुम्ही माझी तक्रार कोणाकडेही करा असे लोकाना धमकावत आहेत. ग्रामसेवक नारनाळीकर यांनाही फोनवर सांगुनही पाणिसोडत नाही , विस्तारअधिकारि गुट्टे यांनाही तोडी सांगुन विनंती करुनही पाणी सोडत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर पो.पा.जि.एन.सांगवे ,किशन व्यवहारे,मंजुळाबाई व्यवहारे,गंगाबाई वडजे, भगवान फड,प्रभाकर व्यवहारे, आनंदा गायकवाड सह पन्नास लोकाच्या या दिलेल्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत यांची योग्य चौकशी करुन न्याय मिळावा अशि मागणी ही या निवेदनात केली आहे.
प्रतिक्रिया :- ग्रामसेवक नारनाळीकर यांना या दिलेल्या तक्रारीविषयी विचारले असता मी बोरी बु.चा चारदिवसापुर्वी चार्ज घेतला आहे व तेथिल डि.पी.जळाल्यामुळे दोनतिन दिवस झाले पाणी नाही पण तक्रार काय आहे मला माहीती नाही मी नांदेडला डि.पी.साठी वायर आणण्यासाठी आलोय मला बोरी येथुन फोन आले असे त्यांनी सांगितले.
*प्रतिक्रिया
सेवक हरी गंगावणे म्हनाले गावातील डि.पी.जळाल्यामुळे पाणी आले नाही दोन गावात पाणीपुरवठा करावा लागतो जुनेगाव व पुर्णवसणगाव पाणी सोडावे लागते मी काही कुणाला शिवीगाळ केली नाही दोन दोन दिवसाला पाणीपुरवठा होत असतो असे त्यांनी सांगितले.