लोहा प्रतिनिधी / शैलेश ढेबंरे
लोहा : आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं , कोण म्हणतंय देत नाय घेतल्या शिवाय राहत नायं या घोषणेने आंदोलनाला लोहा येथील भाजी मंडई परिसरात मुख्य रस्त्यावर अर्धनग्न आंदोलनाची सुरुवात झाली.मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने गुरुवारी दि.६ मे रोजी लोहा येथे निदर्शने करण्यात आली.
एक मराठा लाख मराठा छञपती शिवाजी महाराज की जय या जय घोषणने सुरुवात झालेल्या आंदोलनाला सकल मराठा क्रांती ठोक मोर्चाचे लोहा शहरातील बांधव व विविध संघटनांनी या आंदोलनात सहभागी होऊन आंदोलनाला सुरुवात केली. राज्य सरकारचा मराठा आरक्षणाचा कायदा न्यायालयाकडून रद्द करण्यात आला.त्यामुळे मराठा समाजातुन तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असुन मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने गुरुवारी लोहा येथे निदर्शने करण्यात आली. राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.
कोरोना महामारीची लाट ओसरल्यानंतर मराठा समाजाचे रुद्ररुप दाखवुन देण्याचा इशारा यावेळी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने सरकारला इशारा दिला.मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने अर्धलग्न आंदोलन करून आक्रमक होण्याचे संकेत दिले. केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी मराठा समाजाचा आतापर्यंत वापर केला व मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे.केवळ एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचे काम दोन्ही सरकारने केले आहे. एखाद्या समाजाला आरक्षण देण्यासाठी संघर्ष करावा लागतो याची राज्यकर्त्यांनी गंभीर दखल घ्यायला पाहिजे होती.परंतु तसे झाले नाही.
या मोर्च्यात लोहा शहर व तालुक्यातील सकल मराठा क्रांती मोर्चाचे सर्व बांधव विविध संघटनेचे , मराठा सेवासंघ संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील जाधव , धर्मवीर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रा बाळासाहेब जाधव सर , छावा युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली पाटील पवार विजय चव्हाण शिवमुद्रा सेवाभावी संस्थेचे नंदाजी इंगळे , शिवव्याख्याते लक्ष्मण मोरे , विठ्ठल पाटील कदम ,पत्रकार शैलेश ढेंबरे , वरीष्ठ आईनवाडीकर, पवन लोंढे ,दिनेश लोंढे, मानिक पवार , नागेंद्र क्षीरसागर ,बाळु पाटील पवार आदींची उपस्थिती होती.
येणार्या काळात आंदोलन तिव्र करण्यात येईल अस आंदोलन करत्यानी म्हणणे आहे