कोरोना काळामध्ये शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमांतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रमाचे अहमदनगर जिल्हात कौतूक
युगसाक्षी ; शैक्षणिक
मागील एक वर्षापासून कोरोणा या महाभयंकर महामारी ने राज्यातीलच नाही तर देशातील पूर्ण शाळा आणि कॉलेज बंद आहेत. मागील एक वर्षापासून ऑनलाइन शिक्षण प्रक्रिया पूर्ण देशांमध्ये राबवली जात आहे पण ही ऑनलाइन प्रक्रिया मुलांच्या तळागाळापर्यंत पोहोचत नसल्यामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भुतवडा तालुका जामखेड येथील दिव्यांग आणि उपक्रमशील शिक्षक श्री बळीराम जाधव सर आणि त्यांचे सहकारी शिक्षक श्री ज्ञानोबा राठोड सर यांच्या संकल्पनेतून आणि लोकसहभागातून त्यांनी त्यांच्या गावातील भिंतीवर मराठी विषयाचे लेखन करून त्यांनी कोरोना काळामध्ये शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमांतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रम जिल्ह्यामध्ये राबवला या उपक्रमाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.
या उपक्रमामुळे इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागली मुलं भिंतीच्या जवळ येऊन वाचन व लेखन करू लागली. कोरोना महामारी मुळे विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जात होते ती मुलं आज शिक्षणाच्या प्रवाहामध्ये येऊन त्यांना अभ्यासाची गोडी लागली. या उपक्रमाचे सर्व ग्रामस्थांनी आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य यांनी कौतुक केले.
या उपक्रमासाठी जामखेड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा.श्री. नागनाथजी शिंदे साहेब यांनी प्रेरणा दिली व साकत केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. संतोष हापटे साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.