फुलवळ ; धोंडीबा बोरगावे
कंधार तालुक्यातील फुलवळ येथील सामाजिक कार्यकर्ते शेख शादुल यांची ऑल इंडिया तंजिम ए इंसाफच्या कंधार तालुकाध्यक्षपदी यांची निवड करण्यात आली .सदरील निवड ऑल इंडिया तंजिम ए इंसाफचे नांदेड जिल्हाध्यक्ष अब्दुल बशीर माजीद सर यांच्या हस्ते ऑनलाईन नियुक्तीपञ देऊन निवड करण्यात आली .
ऑलइंडिया तंजिम ए. इंसाफ सामाजिक संघटना असुन गेल्या अनेक दिवसा पासुन सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रात चांगल्या प्रकारे काम करत आहे गेल्या एक वर्षापासुन कोविड काळात जिल्हात मास्कवाटप,कोरोना जनजागृती, नागरिकांनाची तपासनी मोहीम,रक्तदान शिबिर,पाणी वाटपसह ईतर सामाजिक कार्य करत आहे. शेख शादुल यांच्या कार्याची दखल घेऊन त्याना तालुकाकाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे .
निवडी बद्दल, जिल्हा समन्वय शेख रियाज मोईन कुरेशी, , अमेर अर्सील, बिलोली तालुकाध्यक्ष ए.जी.कुरेशी,सय्यद रियाज,वलीओद्दीन फारुखी,मौलाना अहेमद बेग, शेख फारुख ,देगलुरचे तालुकाध्यक्ष अँड लियाखत अली , शेख अस्लम , जावेद अहेमद, मुक्रामाबाद शहराध्यक्ष जलील पठाण,अदिनी शुभेच्छा दिल्या.