कंधार ; प्रतिनिधी
तालुक्यातील लालवाडी परीसरात पोलीस स्टेशन कंधार हद्दीत दि.७ मे रोजी आज्ञात पुरुष जातीच्या इसमासे फाशी घेतलेल्या आणि सडलेल्या अवस्थेत प्रेत सापडले असून कमरेच्या खालील अर्धे शरीराचे रानटी प्राण्याने लचके तोडले आहे.अज्ञाताचे ओळख पटवण्यासाठी कंधार पोलीसात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर असे की दि.७ मे रोजी माजी पोलीस पाटील रघुनाथ बापुराव गित्ते यांनी लालवाडी शिवारात गायरान जमिनीतील बाबू सटवाजी गित्ते यांच्या शेताजवळ अंदाजे ३० ते ३५ वर्ष वयाचे पुरुष जातीचे सडलेल्या अवस्थेत लिंबाच्या झाडाला नायलान दोरीने फाशी घेतलेल्या अवस्थेत असल्याची कंधार पोलीसात खबर दिली.दिलेल्या फिर्यादीवरुन कंधार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संग्राम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक गंगलवाड,सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक आर .यु.गणाचार्य ,पोलीस नाईक टाकरस व पो.हे.कॉ.वानरे यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली असता घटनास्थळी लिंबाच्या झाडाला अंदाजे पंधरा ते वीस दिवसापुर्वी फाशी घेतलेला अनोळखी इसमचे अर्धे शहीर लटकलेल्या आवस्थेत व कमरेच्या खालचे शरीराचे जंगली प्राण्यांनी खालेल्या अवस्थेत दिसून आले.
दिलेल्या फिर्यादीवरुन कंधार पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.नातेवाईकानी ओळख पटवण्यासाठी तात्काळ कंधार पोलीसात पोलीस निरीक्षक संग्राम जाधव 8999881900 व 8652756495 यावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.