लस निर्यातीचा निर्णय दुर्दैवी…. समाजसेविका सौ आशाताई शिंदे

समाजसेविका सौ.आशाताई शिंदे यांनी आरोग्य सुविधेचा आढावा

कंधार/ प्रतिनिधी

देशात भयंकर स्वरुप धारण केलेल्या करोना संक्रमणा दरम्यान देशात करोना लसीचा तुटवडा भासत आहे. एकीकडे, देशात केवळ 5.5 दिवस पुरेल एवढा लस साठा उपलब्ध आहे, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे, कोविड लस निर्यात करण्यावर कोणतीही बंदी नाही आणि देशातील आवश्यकता लक्षात घेऊन
परदेशांना लसीचा पुरवठा सुरूच राहील, परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. देशातील लोकसंख्येचा विचार केला हा तर निर्णय चुकीचा असून लस सध्या निर्यात करणं हे दुर्दैव असल्याचे वक्तव्य उध्दघाटन प्रसंगी बोलताना समाजसेविका सौ आशाताई श्यामसुंदर शिंदे यांनी केले आहे.

ग्रामीण रुग्णालय कंधार येथे दिनांक ७ मे रोजी सायंकाळी ११.०० वाजता केंद्र सरकारने सर्वांना१८ ते ४४ वर्षेपर्यंत मोफत लस वाटप कार्यक्रमाचे उदघाटन आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब यांचे प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उमरज संस्थानचे मठाधिपती एकनाथ महाराज,पुरुषोत्तम भाऊ धोंडगे,कंधार कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती ज्ञानेश्वर चोंडे,डॉ. लोनीकर,माजी सैनिक संघटनेचे बालाजी चुकलवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलतांना शिंदे म्हणाल्या की मी एवढी मोठी नाही की मी देशाच्या पंतप्रधानांवर टिका करू शकेल. परंतु सद्यस्थिती पाहता लस ही मोठ्या प्रमाणात वाढवणं गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी कंधार ग्रामीण रुग्णालयास व कोविड सेंटर मध्ये औषध व सुविधे बदल तहसीलदार यांना बोलावून घेऊन जेवण यावर सखोल चर्चा करून लगेच सुविधा उपलब्ध देण्यासाठी सांगताच तहसीलदार व्यंकटेश मुंढे यांनी सर्व साहित्य पुरवठा करण्यात संबंधित अधिकारी सागितले यावेळी मुख्याधिकारी विजय चव्हाण, गटविकास अधिकारी कैलास बळवंत,
शेरू भायी,योगेश नंदनवनकर यांनीही मार्गदर्शन केले यावेळी डॉ. पदमवार,अझीम भायी,बंटी गादेकर,अवधूत पेठकर,अशोक पा. कळकेकर,मकदूम भायी,सद्दाम कंधारी सहव दवाखान्यातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *