कंधार दिनांक 7 मे (प्रतिनिधी)
कोरोना प्रतिबंधात्मक लस ही अत्यंत सुरक्षित व कोरोना विरुद्ध प्रभावी असल्यामुळे ग्रामीण भागातील सर्व नागरिकांनी आपले व आपल्या कुटुंबियांचे लसीकरण करून घ्यावे असे आव्हान नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर यांनी बहदरपुरा ता. कंधार येथील लसीकरण केंद्रावर लस घेणाऱ्या नागरिकांना मास्क, मिनरल वॉटर,बिस्किट वाटप व उपकेंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांना सनैटाइज़र, व मास्क देतेवेळी आवाहन केले.
यावेळी ग्रामपंचायतचे उपसरपंच हनुमंतराव पाटील पेटकर, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दिपाली गोरे, सचिन पाटील पेटकर, बहदरपुरा युवक काँग्रेस सर्कल प्रमुख वसंतराव पाटील घोरबांड,मनमत मेळगावे, आरोग्य सेविका मेकलवाड, आशा वर्कर रेखा झडते, रुकसाना पठाण, गावातील नागरिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी व ग्रामपंचायत कर्मचारी आदी उपस्थित होते.
कोरोना महामारी च्या संकटाने गेल्या एक वर्षापासून संबंधित जगामध्ये भारतामध्ये धुमाकूळ घातला असून याचा प्रादुर्भाव महाराष्ट्र नांदेड जिल्हा व नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागावर मोठ्या प्रमाणावर झालेला असून हजारो नागरिक बाधित होऊन अनेक जण मृत्युमुखी पडत आहेत या महामारीला प्रतिबंध घालण्यासाठी लस हे एक प्रभावी अस्त्र असून हे लसीकरण गेल्या अनेक दिवसापासून सबंध महाराष्ट्र मध्ये सुरुवात करण्यात आली आहे याचाच एक भाग म्हणून आज नांदेड जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस संजय भोसीकर यांनी बहादरपुरा ता. कंधार येथील लसीकरण केंद्राला भेट देऊन पाहणी केली व विविध साहित्याचे वाटप करून असे आवाहन केले की ग्रामीण भागामध्ये लसीकरणाच्या बाबतीत अनेक गैरसमज असून भीतीपोटी नागरिक लस घेणे टाळत आहेत या लसीमुळे कुठलाही अपाय नसून ही अत्यंत सुरक्षित आहे या लसीकरणाच्या दोन डोस नंतर निश्चितच कोरोना पासून अत्यंत चांगल्या प्रकारे आपला बचाव होईल यासाठी कुठल्याही प्रकारचा गैरसमज न ठेवता 18 वर्षावरील सर्व नागरिकांनी आपले व आपल्या कुटुंबियांचे लसीकरण करून घेऊन या कोरोना महामारीच्या संकटात आपला व आपल्या कुटुंबियांना बचाव करावा.
तसेच शासनाच्या नियमांचे पालन अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडले मास्क वापरणे वारंवार हात धुणे सामाजिक अंतर बाळगणे आदी सूचनांचे पालन करून आपला बचाव करावा.
बहादरपुरा ग्रामपंचायत अंतर्गत या महामारीच्या काळामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचे काम गावामध्ये होत आसुन फवारणी असेल नागरिकांची तपासणी असेल लसीकरण याबद्दल जनजागरण असेल इत्यादी उपसरपंच हणमंतराव पाटील पेठकर व त्यांचे सर्व सहकारी अत्यंत चांगल्या प्रकारे काम करत आहेत असेही संजय भोसीकर म्हणाले यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दिपाली गोरे यांनी आभार मानले.