•••
सद्या सिस्टीम खराब आहे, सिस्टीम बिघडली आहे, हा नवा फंडा मोदी भक्तांनी मार्केटमध्ये सुरू केला आहे. रखैल मीडिया, काही विकावू पत्रकार त्यावरून गळे काढत आहेत. स्वतःची प्रोफाइल लॉक करून ठेवणारे किंवा फोटो प्रोफाईल वर ठेवण्याची हिम्मत नसलेले, अनौरस भक्ताड देखील असेच केविलवाणे प्रयत्न करताना दिसतात.
त्यांना विचारा..
ही सिस्टीम म्हणजे नेमकं काय असते ? ती कुणी कंट्रोल करायची असते ? ती कधीपासून अस्तित्वात आली ? ती जर तुमच्या सरकारला कंट्रोल करता येत नसेल, तर मग हे सरकार काय कामाचे ?
एखादी व्यक्ती १८/१८ तास काम करते, यापेक्षा आणखी काय करणार ? असाही मूर्खपणाचा सवाल ही बिनडोक मंडळी करत असते !
त्यांना पण विचारा..
तुमची ही तथाकथित महान व्यक्ती १८/१८ तास काम करते म्हणजे नेमके काय करते ? नेमके कोणते काम करते ? मसाले वाटत बसते, की गांजा घोटत बसते ? कुणाच्या शेतातलं काय उपटते ? कशाचे भारे बांधते ? की मेंटल हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेत आहे ? किंवा ती जर एवढीच कर्तृत्ववान असेल, तर देशात अराजक सदृश्य परिस्थिती का निर्माण झाली ? न्यायालयाला हस्तक्षेप का करावा लागला ?
..आणि शेवटी हे पण सांगा..
बंधू, डाकू लोक तर जंगलात, पहाडात, गुहांमध्ये २४/२४ तास मेहनत करतात. उन – पाऊस, काटे – गोटे काहीही बघत नाहीत. मग त्या डाकूंना पण ग्रेट मानायचे का ?
कोण किती काम करतो यापेक्षा काय काम करतो, कसे करतो, कशासाठी करतो, त्याचे नेमके परिणाम काय, हे डोळसपणे बघावे लागते ! त्याचा फायदा कुणाला, हे ही बघावे लागते ! आणि त्यासाठी आपलं डोकं ठिकाणावर असावं लागते. पण भक्ताड लोकांना कोण सांगणार ?
कालच मा. न्यायालयाने सरकारला बाजूला ठेवून कोविद संदर्भात टास्क फोर्सची घोषणा केली. ते मोदी आणि भाजपा सरकारच्या नाकर्तेपणावर सरळ सरळ शिक्कामोर्तब नाही का ? सरकारच्या दृष्टीनं तर ती अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे ! अशावेळी कोणताही सभ्य माणूस राजीनामा देवून मोकळा झाला असता !
मात्र.. अशा या महाप्रलयाच्या घडीला सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय, देशाच्या दृष्टीनं एक आशेचा किरण आहे..! त्यासाठी मा. न्यायालयाचे मनपूर्वक आभार मानू या ! लोकशाहीला नवी पालवी फुटत असल्याचं ते लक्षण आहे !
परिवर्तनाचंसाधंसूत्र लक्षात घ्या..
• आधी सांगणे..
• नंतर समजावणे..आणि..
• शेवटी लाथ मारून हाकलणे..!
हे तीन नैसर्गिक टप्पे परिवर्तनाच्या/क्रांतीच्या लढाईत असतात. न्यायालय आपल्या पद्धतीनं पुढे जात आहे. एक एक टप्पा पार करत आहे !
आपणही परिवर्तनाचे टप्पे समजून घेवू या.. विचार करू या. शहाणे होऊ या. संघटित होऊ या..नियोजन करू या..
आणि पूर्ण शक्तिनिशी शेवटची किक मारू या..!
२०२४ काही फार दूर नाही !
मी निघालो पुढे या क्षणापासूनी
जिंकण्याला कुठे तारखा पाहिजे ?
तूर्तास एवढंच..
ज्ञानेश वाकुडकर
अध्यक्ष, लोकजागर अभियान
•••
.
लोकजागर अभियान मध्ये सहभागी व्हा !
धन्यवाद !
•••
संपर्क –
लोकजागर अभियान
• 9004397917
• 9545025189
• 9422154759
• 9773436385
• 8806385704
• 9960014116