उस्माननगर ; राजीव अंबेकर
नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे समर्थक आणि उस्माननगर तालुका कंधार येथील सामाजिक कार्यकर्ते , ग्रामपंचायत सदस्य शिवशंकर मुकुंद काळे यांची ग्रांमसंवाद सरपंच संघ महाराष्ट्र राज्या च्या संघटक पदी निवड झाल्याचे पत्राव्दारे कळविले आहे .
ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते शिवशंकर काळे यांनी अनेक सामाजिक उपक्रमाद्वारे तळागाळातील गोरगरीब जनतेची सेवा करून नावलौकिक मिळविले आहे . गतवर्षी पासून कोरोना वैश्विक माहमारी ने भयभीत झालेल्या गरीब लोकांना अन्नदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली होती . पोलीस स्टेशन येथील कर्मचारी , प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना चहा व फराळाची व्यवस्था करण्यात आली. गोरगरीब, निराधार, महीला / पुरुष यांना शासनाच्या योजनेत सहभागी करून पात्र लाभार्थी यांना लाभ मिळवून दिला.व देत आहेत. उस्माननगर परिसरात त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना कोरोना योध्या म्हणून पुरस्कारही मिळाला आहे.
ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते शिवशंकर काळे यांच्या कार्याची दखल घेऊन ग्रामसंवाद सरपंच संघ महाराष्ट्र राज्याच्या संघटक पदी निवड केल्याचे पत्र प्रदेश अध्यक्ष अजिनाथ बाबाराव धामणे व राज्य सचिव विशाल लांडगे यांनी कळविले आहे . शिवशंकर काळे यांची ग्रामसंवाद सरपंच संघ महाराष्ट्र राज्य संघटक पदी निवड झाल्याबद्दल भाजपा राष्ट्रीय सदस्य तथा माजी सरपंच तुकाराम वारकड गुरुजी , भाजपा शिक्षक आघाडी चे जिल्हाध्यक्ष राजीव अंबेकर, भाजपा तालुका सचिव सुरेश बास्टे मामा, आनंदराव पाटील घोरबांड , साईनाथ पाटील कपाळे,मु. अ. गोविंद बोदेमवाड, माजी सरपंच आमिन आदमनकर, मा. उपसरपंच राहुल सोनसळे, संजय रूद्र वारकड, नारायण घोरबांड, शेषेराव काळम, निजाम शेख, दस्तगीर शेख, साईनाथ भिसे, राजाराम सोनटक्के, राजू गो. डांगे, माणिक भिसे यांच्या सह अनेक मित्र मंडळी यांनी अभिनंदन केले आहे.