लोहा प्रतिनिधी ; शैलेश ढेबंरे
लोहा : शेतात काम करत असताना अचानक वीज कोसळुन तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हि घटना हुलायवाडी परीसरात शेतीमध्ये कांदे काढणीचे काम चालू असताना घडली.
रविवार दुपारी २ वाजता पावसाने मेघगर्जनेसह हाजेरी लावली. या पावसात मेघगर्जना होताच विजेचा कडकडाट झाला हुलायवाडी परीसरात शेतीमध्ये कांदे काढणीचे काम चालू असताना सोनेराव संजय चव्हाण या युवकाच्या अंगावर विज पडल्याने युवकांचा जागीच मृत्यू झाला.
सोनेराव संजय चव्हाण रा.चिखली तांडा राणीसावरगाव ता. गंगाखेड जि.परभणी , वय – १७ याचा वीज पडुन जागीच मृत्यू झाल्याने सावरगाव नसरथ परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.