कंधार
कंधार येथिल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा स्थापनेला ९ मे रोजी ऐतिहासिक घटनेस ६२ वर्ष पुर्ण झाली.ऐतिहासिक शिवस्मारकास ६२ वा वर्धापण दिनी माजी जि.प.सदस्य डॉ.पुरुषोत्तम धोंडगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून या कोरोना काळातही कंधारच्या गनीमी कावा वापरुन निर्माण केलेल्या शिवस्मारकाचा वर्धापण दिन साजरा करण्यात आला.कंधारी गनीमी काव्याने निर्माण केलेले शिवस्मारक तरुणांना प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन माजी जि.प.सदस्य डॉ.पुरुषोत्तम धोंडगे यांनी केले.
महाराष्ट्राला ऐतिहासिक परंपरा असून,संपुर्ण विश्वात शिवप्रभुंचा जाज्वल्य इतिहास आज देखील तरुणाईला प्रेरणास्त्रोत आहे.छ. शिवाजी महाराज यांचा इतिहास सु स्वराज्यातून सुराज्य निर्माण केलेला आहे.ज्यावेळी भारत १५ ऑगस्ट १९४७ ला माझा भारत देश स्वातंत्र्य झाला,मात्र आमचा मराठवाडा निजामाच्या गुलामगीरीत होता.आम्हा मराठवाड्याची जनता १७ सप्टेंबर १९४८ ला स्वतंत्र झाला.याच वर्षी मन्याड खोर्यातील समाजिक क्रांतिवीरांनी श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार यासंस्थेची मुहूर्तमेढ विद्रोही विचारवंत आमदार डाॅ.भाई केशवराव धोंडगे व भाई गुरुनाथराव कुरुडे आणि निवडक सहकार्याने श्रीक्षेत्र गऊळ या आजुळ नगरीत स्थापन करुन शैक्षणिक कार्य आरंभ केले.छ.शिवरायांचे नाव आपल्या शैक्षणिक संस्थेला देवून मराठवाडय़ातील पहिली संस्था म्हणून मान मिळविला.छ.शिवाजी महाराजांचा इतिहास सर्व सामान्यांपर्यंत पोहंचावा हा उद्देश आमदार डाॅ.भाई केशवराव धोंडगे यांचा.
कंधार विधानसभेच्या दुसर्या सार्वत्रिक निवडणुकीत १९५७ साली विजय मिळवून प्रथम आमदार झाल्यानंतर म्हणजे १९५९ हे वर्ष हे कांतिकारक घटनेचे सुवर्ण वर्ष म्हणून नावारूपास आले.या वर्ष ऐतिहासिक कंधार नगरीतील प्रमुख असलेल्या (अत्ताचे शिवाजी चौक) या जागेवरती भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील वीरांणा झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा पुतळा बसविण्यास तयारी सुरु असतांना आमदार डाॅ.भाई धोंडगे यांच्या कल्पक बुध्दीत एक गनीमी काव्याच्या कल्पक विज कडाडली.
त्यावेळी आमदार डाॅ.भाई केशवराव धोंडगे व भाई गुरुनाथराव कुरुडे यांच्यात गनीम काव्याने छोटे खानी चर्च झाली.मन्याड खोर्यातील कलामहर्षी भाई गुरुनाथराव कुरुडे चित्रकार व शिल्पकार नावारुपास होते.त्यांनी शिवप्रभुंचा अर्ध पुतळा तयार करण्यास सुरुवात झाली.इकडे प्रचार सुरु झाला.जलतुंग सागराच्या ईश्यान्य दिशेला असलेल्या काळेश्वर मंदिरा शैजारी शिवगणेश मंदिरात छ.शिवप्रभुंचा अर्ध पुतळ्याची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.अशी सर्वत्र जाहीर करुन दिवस व तारीख ठरली.ती तारीख म्हणजे ९ मे १९५९ या दिवशी मिरवणुने जायचे होते.जीपगाडीमध्ये भाई गुरुनाथराव कुरुडे यांच्या कलाविष्कारातून साकारलेला शिवप्रभुंचा अर्धपुतळा,सिमेंट,पाणी,वाळू घेवून मिरवणुक कंधार शहरातून काळेश्वर मंदिराच्या दिशेने निघाली.मिरवणुक वाद्यांच्या मंगल निनादात छ.शिवरांच्या जयघोष करीत निघाली.मिरवणुक रंगारगल्लीत येताच सहज आमदार भाई धोंडगे यांनी एक कार्यकर्यास हा पुढील प्लॅन लगेच सांगीतला..नंतर त्यांच्या लक्षात आले.हा पुढे जावून आपला इरादा हाणुन पाडेल म्हणून त्याचा हात त्यांनी सोडलाच नाही.पुढे चौकात मिरवणुक जाताच आमदार मोहोदयांचे मांड्या थोपटून भाषण भाषण सुरु झाले.भाषण सुरु असतांना आमदार धोंडगे साहेब यांनी उपस्थित शिवभक्तांना साद घालत.त्या चौकात पुतळा बसविण्यास सुंदर चौथरा तयारच होता.त्या चौथर्याकडे अंगुलीनिर्देश करत या ठिकाणावर शिवप्रभु कसे रुबाबदार दिसतील उपस्थित जनता-जनार्धनांनी एकच गजर केला.छ.ऽऽऽ .
शिवाजीऽऽऽऽऽ महाराज ऽऽऽऽ कीऽऽऽ जयऽऽऽ
हे सर्व नाट्ये पोलिस स्टेशन कंधार उघड्या डोळ्यांनी पाहत होते.छ.शिवरायांचा पुतळा जीप गाडीतून काढला अन् त्या सुशोभित ओट्यावर गनीमी कावाने बसवला.
या
ऐतिहासिक घटनेस ६२ वर्ष पुर्ण झाली.ऐतिहासिक शिवस्मारकास ६२ वा वर्धापण दिनी प्रा.धोंडगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून या कोरोना काळातही कंधारच्या गनीमी कावा वापरुन निर्माण केलेल्या शिवस्मारकाचा वर्धापण दिन साजरा करण्यात आला.