फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )
कंधार तालुक्यातील फुलवळ येथील सर्वांच्याच मनाला चटका लावून जाणारी दुर्दैवी घटना. अठरा दिवसांपूर्वी २२ एप्रिल रोजी वडील माधव गणपती शेळगावे यांचे दुःखद निधन झाले होते तर आज ता. १० मे रोज सोमवारी त्यांचेच छोटे सुपुत्र भगवान माधव शेळगावे वय ४१ वर्ष यांचा दुर्दैवी अंत झाला .
या घटनेने शेळगावे कुटुंबियांबरोबरच फुलवळ गावावर शोककळा पसरली आहे.
एकाच कुटुंबात अवघ्या अठरा दिवसाच्या अंतराने बाप-लेकरचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे शेळगावे कुटुंबियांवर हा काळाने घाला घातल्याने त्या कुटुंबियांबरोबरच अख्या फुलवळ गावावर शोककळा पसरली आहे.
भगवान शेळगावे यांच्या पश्चात आई , पत्नी , एक मुलगा , एक मुलगी , एक भाऊ , एक बहीण असा मोठा परिवार आहे.