योगशिक्षक निळकंठ मोरे यांनी चालवलेला गुगलमिट योगा ठरतोय संजिवनी- प्रा.निशिज कुलकर्णी.

आपल्या देशात योगसाधनेची विजयपताका ज्यांनी वर्षानुवर्षे जपली, त्यांचा गौरव येणाऱ्या योगदिनी २१जूनला व्हायलाच हवा. कंधार येथे राहणारे श्री.निळकंठ मोरे हे याच योगसाधनेतील एक मोती आहेत,


मोती या साठी,कारण शिक्षकाची नौकरी करत असताना, अनंत अडचणींवर मात करत करत योगसाधनेवरच्या विश्वासामुळे व पतंजली योगगुरु श्री.रामदेवबाबा यांचा आदर्श व मार्गदर्शनाखाली हजारो योगसाधक व बरेच योगशिक्षक तयार केले आहेत. योगसाधनेच्या यज्ञकुंडातील त्यांच्या कार्याची सुवर्णाहुती निश्‍चितच ऐतिहासिक ठरणारी आहे.
योगावरील त्यांचा व्यापक व्यासंग, दांडगा अभ्यास हा नेहमी मुलाखतीतून जाणवतो व मी तो त्यांच्या आकाशवाणीवरील मुलाखतीतून अनुभवला आहे.
मी व निळकंठ सर लहानपणीचे वर्गमित्र. कंधार शहरात १९८४ पासून १९८७ पर्यंत आठवी ते अकरावीचे शिक्षण आम्ही सोबतच घेतले.लहानपणी खुप खेळलो,बागडलो.माझा मित्र शांत, समंजस,हुशार सज्जन व मितभाषी असल्याने पुढे खुप मोठा होईल हे जाणवतं होते,व आपण आज हे प्रत्यक्षात अनुभवत आहोत.
दहावी वर्गाच्या गेट टुगेदरच्या निमित्ताने मार्च २०२१ मध्ये ३५ वर्षांनंतर आमची नांदेडला भेट झाली व मित्राचे पन्नाशीतील योगगुरु चे रुप बघून भारावलो.
गेट टुगेदर मध्ये माझ्या दुखत असलेल्या डाव्या पायाची चर्चा झाली व मला काही विशिष्ट योगासने त्यांनी सुचवली.पण कोरोना लाॅकडाऊन मुळे क्लासला उपस्थित रहाता येत नव्हते मग यातूनच ऑनलाईन क्लास ची online Yoga Class संकल्पना तयार झाली व मोरे सरांच्या आणखी काही मित्रांच्या साथीनी ती ३ एप्रिल २०२१ पासून पूर्णत्वास गेली.आज आपण तोच गुगल मीट आँनलाईन योगा क्लास ने ओळखतो.या ऑनलाईन क्लासचा मी एक नियमित योगसाधक असून या कोरोना लाॅकडाऊन काळात शरीराचे स्वास्थ्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी,
ऑक्सिजन लेव्हल योग्य ठेवण्यासाठी, स्वतःला कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी मित्रबंधू, योगगुरु निळकंठजी यांचे मार्गदर्शनाखाली सातत्याने दीड महिन्यापासून योगा करीत आहे व त्याचे फलित म्हणजे माझा पाय ठणठणीत बरा झालाय.शतश: धन्यवाद मित्रा.
सध्या ते पतंजली चे कंधार तालुका प्रभारी म्हणून काम पहातात व योगसाधनेचा अखंड वसा जोपासतात.माझ्या मित्राचा मला अभिमान आहे.आपणही या आँनलाईन क्लासमध्ये सामील होऊन आपले स्वास्थ्य टिकवावे अशी मी आपणास विनंती करतो.आपण सर्व जण लवकरच क्लासमध्ये सामील होणार याची मला खात्री आहे. मोरे सरांच्या कार्यास माझा सलाम व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
धन्यवाद.

प्रा.निशिज कुलकर्णी,

अंबाजोगाई इंजिनिअरिंग कॉलेज जि लातूर.

मो.नं. ९४२१०९००५१


——————————— ********—————–

प्रतिक्रिया – 2

निळकंठ मोरे सरांचा online Yoga Class व कोरोना महामारी

माझे नाव- गजानन गोविंद दादरेकर,
सध्या राहणार- डोंबिवली पूर्व, जिल्हा ठाणे.

सदर योगाक्लासात सहभागी होण्यापूर्वी मी फक्त दोनच योगा म्हणजे, प्राणायाम आणि सूर्यनमस्कार जेव्हा सकाळी वेळ मिळाल्यावर करत होतो, परंतु श्री.मोरे सरांनी online Yoga Class सुरू केल्यामुळे मला योगाचे विविध प्रकारची माहिती मिळाली, त्यामुळे आता माझ्या जीवनात खूप खूप बदल झाले आहेत. आता तर सरांमुळे पहाटे ,05.00 वाजता उठण्याची सवय झाली असून मी सरांसोबत, online मध्ये योगासनातन कमीत कमी पाच मिनीटे प्रत्येक उतानपादासन, शशकासन, वक्तासन, नौकासन, मकरासन, कपालभाती वगैरे करत आहे. तसेच हलासन, सर्वांगासन आणि शीर्षासन योगा करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे माझ्या जीवनात नवचैतन्य आणि उत्साह निर्माण झालेला आहे.
तसेच ग्रुपवर योगाबाबतचे
काही महत्वाचे मुद्दे आणि माहिती शेअर करतात, त्यामुळे आपणास सध्याच्या जीवनशैलीत बदल करता येतो आणि कोरोना महामारीतून आम्हाला बचाव करता येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *