नांदेड ; प्रतिनिधी
एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत शंभर टक्के लोकसहभागातून धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या नियोजनाखाली लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रल व नांदेड अन्नपूर्णा तर्फे सुरू असलेल्या लॉयन्सच्या डब्यामध्ये सोमवारी ५२० गरजूंना मोफत भोजन मिळाल्यामुळे लॉकडाऊनच्या काळात त्यांना दिलासा मिळाला.
अन्नधान्याच्या या चळवळीत अनेकांनी भरभरून मदत केली आहे. १० मे रोजी अदित्य सुजीत मेडेवार यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीराम मेडेवार यांच्यातर्फे ३०० डबे,कै. विदुला दिनकर तुळापुरकर यांच्या स्मरणार्थ प्रशांत तुळापुरकर यांच्यातर्फे १७० डबे आणि कांताबाई पंडितराव कदम यांच्या तर्फे ५० डबे वितरित करण्यात आले. रेल्वे स्टेशन व बस स्थानक येथील प्रवासी तसेच रस्त्यावरील निराधारांना१५ एप्रिल पासून तिसरे लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर नियमितपणे दररोज ४०० ते ५०० लॉयन्सचे डबे वाटप करण्यात येतात. हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सेंट्रलचे अध्यक्ष लॉ. संजय अग्रवाल, सचिव लॉ.ॲड. उमेश मेगदे, कोषाध्यक्ष लॉ. सुनील साबू, प्रोजेक्टर चेअरमन लॉ.अरुणकुमार काबरा यांच्यासह लॉयन्स क्लब नांदेड अन्नपूर्णा चे
अध्यक्ष लॉ. नागेश शेट्टी,सचिव
लॉ.धनराजसिंह ठाकूर,कोषाध्यक्ष
लॉ. अनिल चिद्रावार,प्रोजेक्टर चेअरमन राजेशसिंह ठाकूर , मन्मथ स्वामी, सुरेश शर्मा,संतोष ओझा, विशाल धुतमल हे परिश्रम घेत आहेत.