कंधार ; प्रतिनिधी
आज दिनांक 12 मे 2021 रोजी ग्रामीण रुग्णालय कंधार येथे जागतिक परिचारिका दिन साजरा करण्यात आला .या कार्यक्रमाचे आयोजन ग्रामीण रुग्णालय कंधार चे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुर्यकांत लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रे ब्रदर तर नंदा सोनकांबळे सिस्टर, वाघमारे सिस्टर, इनामदार सिस्टर यांनी आपले मनोगत वेक्त केले.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. टोम्पे सर ,डॉ. महेश पोकले सर ,
डॉ. गजानन पवार सर, प्रोयगशाळा वैज्ञानिक अधिकारी वसंतराव केंद्रे सर, औषध निर्माण अधिकारी बी. एल. शेळके सर , व आरोग्य कर्मचारी बालाजी कल्लाळे सर व ग्रामीण रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.