कंधार ; प्रतिनिधी
अखिल महाराष्ट्र पत्रकार आणि पत्रलेखक संघ (रजि. ट्रस्ट) संस्थेच्या वतीने आणि विश्वात्मक मराठी साहित्य परिषद (द्वारा मविलोअ) मुंबई यांच्या वतीने देण्यात येणारा कोरोना योद्धा समाज रक्षक महासन्मान 2021 हा कंधार येथिल डॉ तक्षशीला बाळासाहेब पवार यांना ऑनलाईन गुगल मिटद्वारे प्रदान करण्यात आला असल्याची माहीती आज बुधवार दि.१२ मे रोजी डॉ तक्षशीला पवार यांनी दिली.
कॉग्रेस पक्षाचे माजी नगराध्यक्ष रामराव पवार व नगरसेविका लक्ष्मी बाई पवार यांच्या सामाजिक कार्याचा आदर्श घेवून डॉ तक्षशीला बाळासाहेब पवार यांनी कोरोना संकट काळात
2020 – 21 कोरोनाची पहिली लाट असताना वैद्यकिय सेवा दिली. त्यांनी आरसैनिक आल्बम 30 या रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी व टिकून ठेवण्यासाठी जवळपास 51 हजार ड्रम मोफत वाटप करून योग्य ते मार्गदर्शन केले होते.
तसेच कोरोनाशी लढा देण्यासाठी मानसिक संतुलन स्थिर ठेवण्याचा सल्ला त्या देत असतं.
मुंबई येथील अखिल महाराष्ट्र पञकार आणि पञलेखक संघ संस्थेच्या वतीने उल्लेखनीय सामाजिक कार्य, रुग्ण सेवा, जनजागृती, प्रबोधनपर सेवा आणि आरोग्य विषयक प्रकल्प या गौरवास्पद कार्यासाठी खास महासन्मान मानपत्र ऑनलाईन सोहळ्यात मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
हा सन्मानसोहळा 3 मे ते 12 मे 2021 या कालावधीत ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन
एन. डी. वाणी सचिव, मानकरी निवड समिती, व संयोजक अखिल महाराष्ट्र पत्रकार आणि पत्रलेखक संघ (रजि. ट्रस्ट )यांनी महाराष्ट्रातून जवळ पास 56 जनाची निवड केली होती. डॉ तक्षशीला बाळासाहेब पवार यांना ऑनलाईन सत्कार सभारभ दिनांक 11/05/2021 रोजी मुंबई येथून गुगल मिटद्वारे संपन्न झाला.या यशाबद्दल डॉ तक्षशीला बाळासाहेब पवार यांचा सर्वच स्तरातुन शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.