गट शेतीच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनी प्रगती करावी ;सौ. आशाताई शिंदे

मंगलसांगवी येथे पाणलोट विकासकामांचे भूमिपूजन

कंधार; प्रतिनिधी:

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा अंतर्गत कंधार तालुक्यतील मंगलसांगवी येथे पाणलोट विकास कामाचे भूमिपूजन सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले,

यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती भाऊसाहेब कदम, तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख, मंडळ कृषी अधिकारी भुरे,सरपंच प्रतिनिधी तोटावाड,मा. प. स.सदस्य केशवराव शिंदे उपस्थित होते, या वेळी उपस्थित शेतकऱ्याशी बोलताना सौ. आशाताई शिंदे म्हणाल्या की, मतदारसंघातील शेतकऱयांनी गट शेतीला प्राधान्य द्यावे व प्रत्येक गावातील शेतकऱयांनी शेती गट स्थापन करून आपला वेळ, पैसा, बचत करावा , गट शेती सोबतच शेतकरी बांधवांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आर्थिक प्रगती साधण्यासाठी प्रयत्न करावेत,खरीप हंगामात सोयाबीन पिकाची लागवड व देखभाल औषधी ,खत व्यवस्थापन ,एक गाव ,एक वाण, महाडीबीटी योजना आशा विविध कृषी विभागाच्या योजना चा शेतकऱयांनी मोठया प्रमाणात लाभ घेऊन आपली प्रगती साधण्याचे आवाहन यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सौ आशाताई शिंदे यांनी उपस्थित शेतकऱयांना केले.

यावेळी गावकऱ्यांच्या वतीने सौ. आशाताई शिंदे यांचा सत्कार करण्यात आला , यावेळी कृषी अधिकारी रमेश देशमुख यांनी खरीप हंगामातील सोयाबीन ,कापूस ,मूग ,तूर ,
इत्यादी पिकाची लागवड व देखभालीसाठी शेतकऱयांना मार्गदर्शन केले यावेळी अशोक पाटील कळकेकर ,योगेश पाटील नंदनवनकर ,जगदेवराव शिंदे, मुरलीधर शिंदे,माधव शिंदे,बालाजी कदम, रोकडोबा गायकर, उमाकांत सोरडगे यांच्या सह शेतकरी बांधव सामाजिक अंतराचे पालन करत उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *