कोरोना बळी ; मुंडेवाडी ग्रा.पं चे पहीले संरपच रघुनाथ मुंडे यांचा कोरोनाने मृत्यू….

फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )

कंधार तालुक्यातील फुलवळ सर्कल मध्ये असलेल्या मुंडेवाडी येथे कोरोनाने कहर केला असुन आजपर्यत येथे 43 जन कोरोना बांधीत झाले असुन यातील मुंडे रघुनाथ भिमराव यांचे आज ता.१२ मे रोजी कोरोनाने निधन झाले. ते मुंडेवाडी ग्राम पंचायत चे पाहिले सरपंच होते तर मुंडेवाडीत कोरोना चा ते पहीला बळी ठरले अशी माहीती विद्यमान सरपंच ज्ञानोबा मुंडे

मुंडे रघुनाथ भिमराव हे येथील ग्रा.प.चे स.न १९९१ ला अस्तीत्वात आलेल्या मुंडेवाडी गावचे ते प्रथम नागरीक संरपच म्हणुन त्यांनी ई.स. १९९१- ते १९९६ मध्ये संरपच या पदावर कार्यरत होते . त्यांचा ८ मे रोजी कोरोना तपासणी अहवाल हा पाॅझिटिव्ह आला होता. त्यांना उपचारासाठी लातुर येथे दाखल करण्यात आले होते , उपचार चालु असतानाच आज १२ मे रोजी त्यांचे निधन झाले . ते ६५ वर्षाचे होते .
त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,सुन,चार मुली असा परीवार आहे.

रघुनाथ मुंडे यांच्या निधनाने मुंडेवाडी गावावर शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *