मे २०२१ रोजी आठ दिवस लाॅकडाउन काळात घरीच राहिल्या नंतर मोकळ्या जागेत फिरण्यास गेलो.त्या ठिकाणाहून आमच्या पाहूण्याकडे कोरोना काळात अघटीत घडले.त्यांना बोलूत असतांना माझी नजर वृक्षराज गुलमोहरावर पडली.माझ््य कवि मनाााचच प्रतिभेने
माझ्या कवि मनाच्या प्रतिभेने भावनेला हाक दिली.हा सौंदर्याची खाण असलेले गुलमोहर आपल्या कोमल अन् आकर्षक फुलाने चक्क रणरणत्या उन्हात लखाटून गेला.त्या ठिकाणीच एक नव्हे किती तरी गुलमोहर वृक्षराज लाल भडक अन् केशरीया रंग छटा असलेल्या भरगच्च सुमनांनी आकर्षनाचे जणुकांही केंद्रच दिसत होते.संपुर्ण भारत खंडात पुर्व ते पश्चिम अन् ऊत्तर ते दक्षिण असे चारही दिशेत उष्ण वातावरणात म्हणजे उन्हाळ्यात त्यांना फुलांचा बहर येतो.या वृक्षराजांना सामाजिक वनीकरणात रस्त्यांच्या दुतर्फा, बगीच्या,घर अन् बिल्डिंगच्या आसपास, शेतामध्ये या वृक्षांची लागवड केली जाते.कांही ठिकाणी बीज पडल्यास पावसाळ्यात बीजांकूर तयार होतो.एकदा का त्याचा मोड निघाला की तो नंतर कमी पाण्यावर आपापले वाढत राहतो.हा गुलमोहर दोन रंगात आढळतो.त्यास संकासूर म्हणटल्या जाते.एक पिवळा अन् दुसरा लाल भडक व केशरीया छटांनी अनेकांना मोहित करतो.याचा उपयोग आयुर्वेदिक वनस्पती म्हणून नावारूपास आले आहे.त्यांची साल व फुल दोन्हीही अनेक आजारावर गुणकारी आहे.पिवळा गुलमोहर अपचन,मासिक पाळी,शरीरावर जखमेचे व्रण, विंचू चावल्यास, बावासीर(मुळव्याध) या सहित अनेकावर आजारावर रामबाण आहे.
एवढेच काय महामानव भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील हा गुलमोहर वृक्षराजांनी मोहिनी
याचे कारण बौध्द धम्मातील मंगल परिणय या कार्यक्रमात गुलमोहर वृक्षराज यांच्या पुष्पांना नव दाम्पत्यास सदिच्छा देण्यास या फुलांच्या वर्षाव रुपाने डोईवर टाकून मंगमय आशीर्वाद दिला जातो.बोधीसत्व महामानवांनी या गुलमोहर वृक्षराजांची निवड का केली?कारण हिन्दु धर्माचा त्याग करतांना सर्व धर्माचा आभ्यास करुन तथागत गौतम बुद्ध यांचा धम्म! “बौध्द धम्म आभ्यासान्ती निवडला.तसेच मंगल परिणयात देखील या गुलमोहर पुष्पाचा उपयोग केला.त्या मंगल परिणयाच्या काळी गुलमोहर बहरलेला असतो.त्या पुष्पांच्या वर्षावाने नव दाम्पत्यास भविष्य काळाच्या सदिच्छा दिल्या जातात.हा गुलमोहर आम्ही आमच्या क्रांतिभुवन बहाद्दरपुरा नगरीतील शांतीघाटावर गुलमोहर वृक्षराजांची अनेक वृक्ष होती.आम्ही व आमचे मित्र मंडळी उन्हाळ्यात दुपारी शांतीघाटावर जावून त्यांच्या शेंगा पाडायचे आणि त्या तलवारीगत फिरवत छ.शिवरायांच्या ढाल-तलवारी युध्दांचा ऐतिहासिक फिल घ्यायचा.त्या गुलमोहर फुलातले लालभडक पांढर्य छटा असलेले.एक पुष्पाची एक पाकळी खातांना आंबुस लागत असत,वरतून सूर्य आग ओकतांना यांच्या पुष्पाच्छादीत सावलीत तलवार बाजीची मजा घेत दिवस कधी मावळतीकडे जायचा हे कळायचे नाही!कांही दिवशी आंब्याच्या झाडाखाली पंपहाऊस,एखाद्या शेतात कैर् या
खाण्याचा बेत आखतांना सोबत मीठ, तिखट,जिरे एकत्रित करुन आंबटखट्ट कैर् याचा मोह कांही औरच!
एके दिवशी आमच्या माझ्या चुलत भावाची शांतीकची पुजा होती आम्हास डाकबंगल्याकडे असे घरच्यांनी सांगीतले.आम्ही शांतीघाटावर गेलोत तेथे
वाॅचमॅन धोडिंबाराव दुल्लेवाड हे आम्हा लहाग्याना हुसकावत आपले कर्तव्य पार पाडत.शांतीघाटच्या पश्चिम दिशेला रोडच्या कडेला पिचिंग नव्हती.त्यामुळे मला वरतून रस्त्यावर उताराने पळत येतांना माझा तोल गेला.कारण धोंडिबाजी काका पकडून ठेवतील या भीतीने पळत असतांना माझे डोके रेडवर पडल्याने आवडले.डोके फुटले.सोबतच्या मित्रांनी तसेच डोक्याला धरुन घरी आणले.आजही तोव्रण माझ्या कपाळावर आहे.तो स्पष्ट दिसत नाही…फक्त हाताने स्पर्श केल्यास जाणिव होते.या वेळी आम्ही गुलमोहर वृक्षराज यांच्या शेंगफळ हे खेळण्याचे साधन होते.सध्या खेळच इतिहास जमा झाला.फक्त मोबाईल युग असल्याने आमच्या सारख्या खेळांना ही पिढी नक्कीच मुकली आहे.
५:४५ वाजता एस.आर.टी.काॅलेज बाळंतवाडी कंधार येथे फेरफटका मारण्यास गेलो असता.तेथील गुलमोहर वृक्षराज यांनी माझ्या कविमनाला मोहिनी घातली.त्या चित्तवेधक सुमनांकडे पाहून माझ्या मनी शब्दबिंब सुचले.त्याच ठिकाणी मेलवर ड्राप्टींग करुन….. माझ्या शिवाजी नगर कंधार येथील निवासस्थानी येताच इडीट करुन आपल्या सर्वांच्या सेवेत शब्दबिंब……..
गोपाळसुत
दत्तात्रय एमेकर गुरुजी
क्रांतिभुवन बहाद्दरपुरा