कंधार ; प्रतिनिधी
कंधार तालुक्यातील कोरोना मुळे आई वडील गमावलेली बालकांची माहिती सोमवार दि.२७ मे पर्यंत दाखल करा अशा सुचना तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांनी कंधार तालुक्यातील तलाठी,ग्रामसेवकांना गुरुवार दि.१३ मे रोजी दिल्या आहेत.
आपल्या गावात/भागात कोरोना मुळे आपली आई वडील गमावलेली बालके माहिती असतील तर त्यांची माहिती सोमवार पर्यंत नगरपालिका ,ग्रामपंचायत ,
तलाठी, ग्रामसेवक, आशा वर्कर, पोलीस पाटिल यांचे मार्फत तहसील कार्यालयस/ पंचायत समितीस व तहसिल येथे माहिती द्यावी अशा सुचना देण्यात आल्या.
सदर माहीती जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखालील समिती समोर दि.१७ मे पर्यत सादर करायची आहे.ही घेताना मनाची खूप दुःखद स्थिती होते, अशी बालक संख्या आपल्या तालुक्यात कमीत कमी असावी अशी ईश्वर चरणी प्रार्थना पण दुर्दैवाने असतील तर कृपया तात्काळ माहिती द्यावी अशा सुचना प्रशासनाच्या वतीने तहसिलदार व्यंकटेश मुंडे व गटविकास अधिकारी कैवास बळवंत यांनी आपल्या यंत्रणेला दिल्या आहेत.