बहादरपुरा येथील आदर्श ए.एन.एम.सौ.विद्या चंदेल-राजपूत यांचा ग्रामपंचायत च्या वतिने सन्मान

“जागतिक परिचारिका दिना निमित्त बहादरपुरा ग्रामपंचायत ने केले सन्मानित”

कंधार (प्रतिनिधि)


१२ मे हा जागतिक परिचारिका दिन,फ्लोरेंस नाईटेंगल यांच्या जन्मदिनाला जागतिक आरोग्य संघठनेने जागतिक परिचारिका दिन म्हणून घोषित केले तेव्हा पासून आरोग्य सेवेत उत्कृष्ट व प्रामाणिक पणे कर्तव्य बजावणी करणाऱ्या परिचारिकांना सन्मानित करण्यात येते,याच जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून बहादरपुरा ग्रामपंचायत च्या उपसरपंच सौ.कल्पना चंद्रकांत पेठकर यांच्या हस्ते बहादरपुरा येथील शासकीय आरोग्य उपकेन्द्रात कार्यरत असलेल्या
आदर्श ए.एन.एम.सौ.विद्या चंदेल-राजपूत यांना आज सन्मानित करण्यात आले.


दि.१२ मे २०२१ रोजी
ठरल्याप्रमाणे बहादरपुरा आरोग्य उपकेन्द्रात इनचार्ज ए.एन.एम.सौ.विद्या चंदेल-राजपूत ह्या आपल्या नागरिकांना कोवीड ची लस देत होत्या,४८ व्या लाभार्थ्यांना कोवीड लस टोचत असतांना बहादरपुरा येथील शासकीय आरोग्य उपकेन्द्रात बहादरपुरा येथील हणमंत माधवराव पेठकर उपसरपंच सौ.कल्पना चंद्रकांत पेठकर ग्रामपंचायत सदस्या सुमनबाई शंकर खरात,आदी ग्रामपंचायत चे पदाधिकारी उपकेन्द्रात आले व म्हणाले राजपूत मँडम आम्हाला तुमचा सत्कार, सन्मान करायचा आहे, त्यावर सौ.चंदेल-राजपूत म्हणाल्या माझा सत्कार कशासाठी,
मी तर आपले कर्तव्य बजावणी करत आले आहे,यावर सौ.पेठकर म्हणाल्या आज जागतिक परिचारिका दिन आहे,आजचा दिवस तुमचा आहे म्हणून आम्ही ग्रामपंचायत चे पदाधिकारी तुमचा सत्कार करण्यासाठी आलोत,आणि तुमचा सत्कार आम्ही का करु नये,राजपूत मँडम तुम्ही तर आमच्या तिसऱ्या पिढीची सेवा करत आहात,तिन दशकापासून उत्कृष्ट आरोग्य सेवा करत आहात, उलट आम्हीच आजपर्यंत तुमचा सत्कार करु शकलो नाही याची खंत वाटते,या प्रसंगी ग्रामसेवक परशुराम वाडीकर,सचिन तानाजी पेठकर,तानाजी केरबा पा.पेठकर,रविंद्र कदम, सुलतान मियाँ सौ.वाघमारे मँडम,शेख,रेखा गायकवाड,सलिमाबी सरवरशेख,रेखा झडते,कांचन कुरुडे,रुक्साना,शिवकांता भुसेवाड आदी आरोग्य कर्मचारी व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *