लॉयन्सचा डबा हा उपक्रम ३१ मे पर्यंतच सुरू राहणार – माहिती प्रोजेक्ट चेअरमन धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांची माहीती

नांदेड ; प्रतिनिधी

असणारा लॉयन्सचा डबा हा उपक्रम
३१ मे पर्यंतच सुरू राहणार असून तोपर्यंत २९५० डब्यांची आवश्यकता असल्याची माहिती प्रोजेक्ट चेअरमन धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी दिली आहे.

रविवारी लॉयन्सच्या डब्याचा तिसऱ्या लॉकडाऊन मधील सलग ३१ वा दिवस असून आतापर्यंत दहा हजारापेक्षा जास्त डबे दिले आहेत. १५ मे च्या अन्नदात्यांमध्ये नवलकिशोर गुप्ता यांच्यातर्फे १०० डबे,दिलीप पाध्ये यांच्या तर्फे १०० डबे,दिलीप व सौ. स्नेहलता ऊत्तरवार,भोकर लग्नाचा ४२ वा वाढदिवसानिमित्त ५० डबे,राजेश गवळी यांच्यातर्फे ५० डबे,कै.आनंदराव कोकाटे म्हैसा यांच्या स्मरणार्थ विनायकराव राजूरकर यांच्यातर्फे ५०डबे,सौ.पाटीलताई मालेगाव यांच्या तर्फे ५० डबे यांचा समावेश आहे.


१६ मे ला इंडो जर्मन फ्रेंड्स ग्रुप तर्फे १०० व्यक्तींना पूर्ण जेवण, अरविंदराव मुधोळकर यांच्या तर्फे १०० डबे,कु.मनस्वी देव तर्फे १०० डबे,कै.कमलाबाई त्र्यंबकराव जोशी हिच्या वर्ष श्राद्धदिनी ५० गरजूंना गोड जेवण वितरित करण्यात आले.दिलीप ठाकूर यांच्या समवेत डबे वितरण करण्यासाठी राजन जोजारे, अरुणकुमार काबरा, सुरेश शर्मा, संतोष ओझा, प्रशांत पळसकर, मन्मथ स्वामी, राजेशसिंह ठाकूर, विशाल धुतमल यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमामध्ये अनेक गरजूंना पोटभर जेवणाची सुविधा अन्नदात्यांचे समाधान होत आहे.देणगीदारांनी
९४२१८ ३९३३३ या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर स्वयंसेवक त्यांच्या घरी जाऊन देणगी जमा करून लगेच पावती देतो. बाहेरगावचे अन्नदाते गुगल पे करून डब्याची नोंदणी करू शकतात. तरी या उपक्रमासाठी दानशूर नागरिकांनी भरभरून सहकार्य करावे असे आवाहन सेंट्रलचे अध्यक्ष लॉ.संजय अग्रवाल ,सचिव लॉ.ॲड. उमेश मेगदे, कोषाध्यक्ष लॉ. सुनील साबू, प्रोजेक्टर चेअरमन
लॉ.अरुणकुमार काबरा यांच्यासह
लॉयन्स क्लब नांदेड अन्नपूर्णा चे अध्यक्ष लॉ.नागेश शेट्टी,सचिव लॉ.धनराजसिंह ठाकूर,कोषाध्यक्षलॉ. अनिल चिद्रावार,प्रोजेक्टर चेअरमन राजेशसिंह ठाकूर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *