कंधार प्रतिनिधी
तालुक्यातील ग्रामपंचायत अंतर्गत हिंदू स्मशानभूमी व मुस्लिम( कब्रस्तान)मध्ये लाईटचे खांब किंवा सौर ऊर्जा चे खांब बसून फोकस तात्काळ बसवण्यात यावे अशी मागणी तहसीलदार यांच्याकडे ऑल इंडिया तन्जिम- ऐ इंसाफ चे तालुकाध्यक्ष शेख शादुल भाई यांनी केली मागणी त्या वेळी कंधार चे पत्रकार सिकंदर भाई ,सय्यद हबीब भाई, पत्रकार, व शेख सर ,यांची उपस्थिती होती,
कंधार तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये हिंदू स्मशानभूमी व मुस्लिम स्मशानभूमी येथे व त्या जागेमध्ये पाच- पाच सौर ऊर्जाचे किंवा लाईटचे खांब बसुन रोशनाई करण्यात यावी कोरोना संकट काळामध्ये अनेक गावोगावी नागरिकांचे निधन होत आहे आणि या निधनाच्या काळात रात्री-बेरात्री अंत्यविधी करण्याची नागरिकांना वेळ येत आहे अंत्यविधी ठिकाणी कसल्याच प्रकारची लाईटची व्यवस्था नसल्या कारणामुळे अनेकांना त्यांचा नाहक त्रास होत असल्यामुळे तात्काळ लाईटची व्यवस्था करा अशी मागणी अॉल इंडिया तंजिम ए इंसाफ च्या वतीने करण्यात आली.