मानसिक उर्जा व उत्साह वाढण्यासाठी शुल्क न आकारता, मानवी आरोग्य वृद्धींगत करण्यासाठी निळकंठ मोरे यांचे सेवाव्रत अतुलनीयच – बी.के.ज्योती बहनजी

ब्रह्माकुमारी विद्यालय, कंधार सेवा केंद्राच्या संचालिका बी.के.ज्योती बहनजी यांच्या कडून योगगुरु श्री. नीळकंठजी मोरे सर यांच्याबद्दल, ते योगाचे वर्ग घेत असल्याचे ऐकले व इच्छा दर्शविता लगेच योगवर्गाला प्रवेश मिळाला.
मोरे सरांचे योग वर्गाचे शिकविणे हे अतिशय खेळीमेळीच्या आनंदी वातावरणात असते. योगाच्या सहजसाध्य आसनांपासून ते थोडी काठिण्यपातळी वाढविणाऱ्या आसनांपर्यत कधी आपण पोहचतो ते कळतही नाही. आसनांबरोबर सुमधुर संगीताची साथ व जिव्हाळ्याचे प्रबोधन यांचा सुरेख संगम साधण्याची छानशी कला सरांना अवगत आहे. या योगासनांची अशी काही गोडी लागली आहे की, सकाळी लवकर उठण्याची फारशी आवड नसणारी मी सुद्धा सकाळच्या 5.30 वाजण्याची ची आतुरतेने वाट पाहत असते.


हे योगावर्ग ज‌ॉईन केल्यापासून शारीरिक आणि मानसिक उर्जा व उत्साह वाढला आहे. विशेष म्हणजे या योगवर्गासाठी कोणतेही शुल्क न आकारता, मानवी आरोग्य वृद्धींगत करण्यासाठी सरांनी हाती घेतलेले हे सेवाव्रत खरोखरचं अतुलनीय आहे.
त्याच्या या कार्य मोहिमेचा भाग होण्याची संधी मला मिळाली हे माझे भाग्य समजते.


-प्रा.आशा बामणे पांडागळे,पालघर
मो.नं- 9767520777

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *