खा.राजीव सातव यांची पोकळी न भरणारी- नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी

लोहा/श प्र शिवराज दाढेल लोहेकर

एक अष्ठपैलू व्यक्तिमत्व असलेले असे खासदार राजीव सातव जे गोरगरीब जनतेचे प्रश्न मार्गी लावणारे,कळमनुरी,हिंगोली व राज्याचा एक प्रभुत्व,उमदा नेतृत्व आज घडीला महाराष्ट्राने दुर्दैवी गमावला,कोणताही पक्ष असो अथवा जात कधीही या नेत्यांनी मानली नाही.मी जेव्हा काँग्रेसमध्ये होतो तेव्हा हे उमदा नेतृत्वखाली काम करण्याची संधी मिळाली,त्यावेळी कळमनुरी मतदार संघाचे आमदार होते.व त्यानंतर त्यांनी हिंगोली चे खासदार सुभाष वानखेडे यांच्या विरोधात उभे राहिले सर्व देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट असताना देखील राज्यामध्ये खा राजीव सातव यांनी,सुभाष वानखेडे यांच्यावर मात केली मराठवड्यातून एकमेव त्यांनी आपला मिळविला.या अश्या उमद्या नेतृत्वाला मी व माझ्या सर्व नगरपालिकेच्या सर्व सदस्यांकडून भावपूर्ण श्रद्धांजली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *