खा. राजीव सातव यांचा मृत्यू कशामुळे झाला?

काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचं रविवारी 16 मे रोजी पहाटे निधन झालं. त्यांच्या शरीरात सायटोमेगॅलो Cytomegalovirus हा नवीन व्हायरस आढळला होता. त्यांच्या शरीरात इन्फेक्शन देखील झाले असून या सर्व कारणाने प्रकृती नाजूक झाली असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजीव टोपे यांनी शनिवारी 15 मे रोजी दिली होती. सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू होते. राजीव सातव यांना 19 एप्रिलपासून बरं वाटत नव्हतं. कोविडची लक्षणे दिसत होती. त्यामुळे त्यांनी 21 एप्रिल रोजी करोना चाचणी करून घेतली. 22 एप्रिल रोजी या चाचणीचा अहवाल आला होता. त्यात सातव यांचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झालं होतं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी 23 एप्रिल रोजी ते जहांगीर रुग्णालयात दाखल झाले.

उपचारानंतर त्यांची प्रकृती उत्तम होती मात्र, 25 एप्रिलला त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे तातडीने त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होतं. त्यांनी कोरोनावर मात केली. त्यांचा कोरोना रिपोर्टही निगेटिव्ह आला होता.

45 वर्षीय राजीव सातव हे सध्या कॉंग्रेसचे राज्यसभेचे खासदार होते. त्यांच्याकडे सध्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचं गुजरात प्रभारी पद होतं. तसंच काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे ते निमंत्रक होते. राजीव सातव यांच्या मातोश्री रजनी सातव काँग्रेसच्या आमदार आणि राज्यसभेच्या खासदार होत्या.

राजीव सातव यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मोदी लाटेतही विजय मिळवण्याची कामगिरी केली होती. त्यांनी हिंगोली मतदारसंघात शिवसेनेच्या माजी खासदार सुभाष वानखेडे यांना पराभूत केलं होतं. राहुल गांधी यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख होती. पुढे 2017 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीदरम्यान सातव यांच्यावर गुजरात प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली. त्या निवडणुकीत काँग्रेसने चांगलं यश मिळवलं. पण 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला होता. त्यानंतर त्यांची राज्यसभेवर वर्णी लावण्यात आली होती.

कॉंग्रेस आणि गांधी घराण्याशी असलेल्या निष्ठेमुळे त्यांच्यावर गुजरातच्या कॉंग्रेस प्रभारी पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. युथ कॉंग्रेसचे अध्यक्षपद देखील त्यांच्याकडे होते.
काँग्रेस खासदार राजीव सातव (Rajiv Satav) यांचं पुण्यातील जाहंगीर हॉस्पिटलमध्ये निधन झालं. ते मागील 21 दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. सातव यांना सुरुवातीला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्या शरिरात सायटोमॅगलो व्हायरस Cytomegalovirus देखील आढळला.

सायटोमॅगलो व्हायरस हा एक संसर्गजन्य आजार आहे. ‘बीबीसी मराठी’ नं दिलेल्या वृत्तानुसार गरोदर महिलांमध्ये या आजाराचा प्रमाण जास्त असतं. यामध्ये गर्भपात होण्याची शक्यता देखील जास्त असते. तसंच एचआयव्ही ग्रस्तांमध्ये या आजाराचं प्रमाण जास्त आढळतं.

या व्हायरसच्या संसर्गामुळे दृष्टी जाऊ शकते. तसंच रॅटिनावर देखील परिणाम होतो. काही जणांच्या फुफ्फुसात देखील याचं इन्फेक्शन होतं. त्याला सीएमई न्यूमोनिया असंही म्हणतात. या आजारामुळे रुग्णांना डायरियाचा त्रास होणे तसंच मेंदूमध्ये संसर्ग होण्याचा धोका असतो.

या व्हायरसनं संक्रमित असलेल्या रुग्णाच्या संपर्कात आल्याची याची लागण होते. संक्रमित रुग्णाची लाळ, रक्त आणि लघवीतून पसरतो. स्तनपान करणाऱ्या आईपासून बाळाला देखील याची लागण होऊ शकते. नवजात बाळ तसंच लहान मुलांमध्ये हा आजार जास्त आढळत असला तरी ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे, अशा प्रौढ व्यक्तींना देखील याची लागण होऊ शकते अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

प्रौढांमध्ये या आजाराची लक्षणे दिसून येत नाहीत. मात्र कोव्हिड सारख्या आजारामुळे रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यानं याचा मेंदू, डोळे आणि फुफ्फुसांवर परिणाम होण्याची शक्यता असते.

संसर्गजन्य आजार तज्ज्ञ म्हणतात, सायटोमेगॅलो व्हायरस हा एक संधीसाधू रोग म्हणून ओळखला जातो. गरोदर महिलांमध्ये याचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे महिलांची TORCH टेस्ट केली जाते. यातील C म्हणजे हा व्हायरस आहे. यामुळे गर्भपात होण्याची शक्यता असते. एचआयव्ही ग्रस्तांमध्ये या व्हायरसचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळून येतं”, असं डॉ. गिलाडा यांनी सांगितलं. या व्हायरसची लागण झाल्यामुळे काय परिणाम होऊ शकतात यावर डॉ. गिलाडा म्हणाले, “या व्हायरसच्या संसर्गामुळे दृष्टी जाऊ शकतात. रॅटिनावर याचा परिणाम होतो. काही लोकांमध्ये याचं इन्फेक्शन फुफ्फुसात होतं. याला सीएमई न्यूमोनिया CME pneumonia म्हणतात

काही रुग्णांना यामुळे डायरियाचा त्रास होण्याची शक्यता असते. मेंदूमध्ये देखील या आजाराचा संसर्ग होण्याची शक्यता असते. या व्हायसवर कोणते उपचार उपलब्ध आहेत याबाबत डॉ. गिलाडा Dr. Gilada म्हणाले, “या आजारावर आता काही औषधं नियंत्रण आणि प्रतिबंध यासाठी आहेत. याचे उपचार सहा ते आठ आठवडे करावे लागतात.

काही लोकांमध्ये कोरोना संसर्गात या व्हायरसमुळे आजार होतो. रुग्णाची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याची गरज आहे.
हा व्हायरस संक्रमित रुग्णाच्या संपर्कात आल्याने पसरतो. संक्रमित रुग्णाची लाळ, रक्त आणि लघवीतून पसरतो. स्तनपान करणार्या आईपासून बाळाला याचा संसर्ग होण्याची शक्यता असते. सायटोमेगॅलो व्हायरस हा नवजातबाळांमध्ये आणि लहान मुलांमध्ये प्रामुख्याने आढळून येतो. प्रौढांनाही याचा संसर्ग होऊ शकतो. खासकरून ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी आहे.

डॉक्टर म्हणतात की, कोरोनाच्या गंभीर रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी स्टेरॉइड्स द्यावे लागतात, तसेच टोसिलिझुमॅबसारखे (जीवरक्षक नाही असा निष्कर्ष आहे तरी) औषध वापरण्यात येते. ही औषधे मार्गदर्शक तत्त्वे पाळून आवश्यकता असेल तरच आणि कमीत कमी प्रमाणात द्यायला हवीत. या औषधांमुळे रुग्णांची इम्युनिटी खूप कमी होते.

आपल्या अवतीभोवती पाण्यात, मातीत किंवा आपल्या नाकात, आतड्यांत अनेक जीवजंतू असतात. जर एखाद्याची प्रतिकारशक्ती कमी झाली तर निद्रस्थ अवस्थेत राहणारे जीवजंतू या परिस्थितीचा फायदा घेऊन शरीरावर आक्रमण करतात. कोविडमधून वाचलेल्या गंभीर रुग्णांमध्ये दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यांनंतर होणारी “काळी बुरशी” सध्या धुमाकूळ घालत आहे. सायटोमेगॅलो व्हायरसCytomegalovirus हा विषाणूसुद्धा असाच संधिसाधू आहे.

सायटोमेगॅलो व्हायरस (सीएमव्ही)Cytomegalovirus हा एक सामान्यपणे आढळणारा विषाणू आहे. रोग्याच्या शारीरिक द्रावातून- जसे की लाळ, लघवी, दूध इ. यांचा फैलाव होऊ शकतो. सामान्य व्यक्तीला सहसा याचा कुठलाही त्रास होत नाही. फक्त काहींना ताप व अशक्तपणा जाणवू शकतो. ज्यांची प्रतिकारशक्ती कमी झालेली असते त्यांना मात्र डोळे, फुप्फुस, यकृत, किडनी, मेंदू, आतडे अशा अनेक अवयवांना गंभीर इजा होेऊ शकते.
आयजीएम अँटीबॉडी तपासणीद्वारे हा नुकताच झालेला आजार आहे का, हे कळते. यामध्ये गॅनसायक्लोव्हीर/ व्हॅलगॅनसायक्लोव्हीर या औषधांचा फायदा होतो, असा डॉक्टरांचा अनुभव आहे.

सायटोमेगॅलो व्हायरस हा विषाणू हरपीस जातीच्या विषाणूंपैकी एक आहे.‌एलायझा व पीसीआर चाचणीद्वारे या विषाणूचे निदान होऊ शकते. मनुष्यापासून मनुष्याला शरीरातील स्रावातून पसरतो. बऱ्याच सामान्य लोकांमध्ये या विषाणूंचा संसर्ग झालेला असतो आणि कुठलीही लक्षण नसतात.
हा विषाणू लाळेच्या ग्रंथीत किंवा किडनीमध्ये शांतपणे राहतो; पण जेव्हा आपली प्रतिकारशक्ती कमी होते तेव्हा हा शरीराच्या वेगवेगळ्या अवयांना हानिकारक ठरू शकतो. ज्या पेशींमध्ये हा विषाणू वाढतो त्या पेशींचा आकार खूप मोठा होतो.

वृत्तसंपादक दैनिक लोकाशाचे वृत्तसंपादक भागवत तावरे यांनी आरोप केला आहे की, राजीव सातव हे कोरोनाने गेले नाहीत तर त्यांचा मृत्यू डॉक्टरानी दिलेल्या हायर डोस मुळे झालाय ? होय डॉक्टरांचा ओव्हर डोस भोवलाय ? आरोग्य यंत्रणेला उपचाराची दिशाच नाही. वाटेल तसे उपचार देताना अंधारात चाचपडत डॉक्टर काम करत आहेत काय? खा. राजीव सातव यांच्या शरीरात कोरोना संसर्ग नव्हता तर जहांगीर हॉस्पिटलकडून दिल्ली येथील लाल नावाच्या प्रयोगशाळेत नमुने पाठवले असता त्यांच्या शरीरात सायटोमॅगलो विषाणू आढळला. ज्यावर 2 एम एल इंजेक्शन द्यायचे तर डॉक्टर यांनी दबावात 30 एम. एल. इंजेक्शन देण्यात आले ज्यामुळे फुफुस फाटले . 75 वर्षीय रजनीताई सातव या त्यांच्या आई कोरोनावर मात करून परतल्या. मात्र, मुलाला मात्र ते शक्य का झाले नाही? यात शरीर म्हणून राजीव यांची किती चूक व डॉक्टर महाशयांनी ओव्हर डोस दिल्याची किती , असा प्रश्न पडतो आहे .

संपादकीय

गंगाधर ढवळे ,नांदेड

3 thoughts on “खा. राजीव सातव यांचा मृत्यू कशामुळे झाला?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *