नांदेड ; दि.१८ /५/२०२१ प्रतिनिधी
लोहा कंधार तालुक्यातील शेतकरी भ्रमनिरास झाला आहे. स्वतःला लोकप्रिय कर्तव्यदक्ष असे बिरुद लावून मतदार संघाच्या विकासाचा आव आणणारे आमदार शामसुंदर शिंदे यांच्या प्रशासकीय कामाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. यंदा पीक विम्यात कर्तव्यदक्षतेमुळेच लोहा तालुका निरंक राहीला आहे तर कंधार तालुक्याला केवळ एक कोटी नाम मात्र पीकविमा मिळाला आहे.सवंग लोकप्रयतेसाठी फसवे आश्वासन देणाऱ्या आमदार शिंदे यांची निष्क्रियता उघड झाली आहे.
अशी खरमरीत टिका राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीपदादा धोंडगे यांनी केली आहे.
जिल्ह्यात मिळालेल्या पिक विम्यात भोकर वगळता सर्वच तालुक्यातील शेतक-यांवर अन्याय झाला असून लोहा, माहूर निरंक आहे. या संदर्भात एक सविस्तर निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष दिलीपदादा धोंडगे यांनी जिल्हाधिकारी यांना दिले. त्यावेळी रायुको तालुकाध्यक्ष फुलाजी ताटे, कंधार तालुकाध्यक्ष माधव पाटील मोरे यांची उपस्थिती होती.
रायुका जिल्हाध्यक्ष दिलीपदादा धोंडगे यांनी सांगितले की मागील खरीप हंगामात पंजिकृत इपको टोकियो या कंपनीला शेतकरी राज्य व केंद्र सरकारकडून ६१३ कोटी रुपयांचा प्रिमिअर भरणा केला. आपल्या जिल्ह्याला २२ कोटी व कापणी पहचान ६ कोटी अशी रक्कम विम्यापोटी दिली म्हणजे एकूण रकमेच्या केवळ १३ ते १४ टक्के इतकीच आहे. यातही भोकर तालुक्याला सर्वाधिक पिकविमा मंजुर असून लोहा-माहुर निरंक आहे. पीक कापणी अहवालात गड़बड़ी करून प्रशासन व विमा कंपनीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे असा आरोप दिलीपदादांनी केला आहे. एकूण ६१३ कोटी पैसी ८० टक्के रक्कम शेतकऱ्यांना पीक विम्याच्या मोबदल्यात मिळावी अशी मागणी केली आहे.
लोहा-कंधारच्या आमदारांची निस्कीयता उघउ झाली आहे.लोकांना वाटल’ त्यांना प्रशासनातील अनुभव आहेत आपले भले होईल पण’ धन ‘वान आमदारांची प्रशासकीय पातळीवरील मर्यादा उघड झाली आहे. संपूर्ण मतदार संघातील गावांची ओळख नसलेले आमदार शिंदे स्वत:ला ‘ लोकप्रिय’ म्हणून बिरुद लावून घेताहेत .पण किती ‘लोक’ सोबत आहेत असा सवाल दिलीपदादा धोंडगे यांनी उपस्थित करत आ. शिंदे यांच्या कर्तव्यदक्षतेमूळे लोहा तालुका पीक विम्यापासून’ निरंक’ राहिला आहे. दीच काय लोकप्रियता ,कर्तव्यदक्षपणा
अशी खरमरीत टिका दिलीपदादा घोडगे यांनी व्यक्त केली.
खताच्या दरात केंद्र सरकारने जी दरवाढ केली त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार आहे. दरवाढीचा व केंद्र सरकारचा निषेध राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने यावेळी करण्यात आला.