राष्ट्रवादीचे बंटी लांडगे यांच्या कडून 500 मुस्लिम बांधवाना शिरखुर्मा वाटप


नांदेड ; प्रतिनिधी


शहरातील प्रभाग क्रमांक 18 देगावचाळ मध्ये राष्ट्र्वादी काँग्रेसचे जिल्ह्या उपाध्यक्ष बंटी लांडगे यांनी मुस्लिम बांधवाना शिरखुरमाचे वाटप करुण

” एकता आणि मानवतेचे दर्शन घडवले. रमजान ईद निमित्त बंटी लांडगे यांच्या वतीने रविवारी हा आगळा वेगळा कार्यक्रम घेण्यात आला. देगावचाळ येथील जवळपास 500 मुस्लिम बाँधवांना डोअर टू डोअर जावून शिरखुमाचे डब्बे वाटप करण्यात आले.

यावेळी सचिन सिरसिल्ला, ए आर बॉन्ड, आबू उमेर, उमेश हिंगोले, आकाश डाकोरे यांच्या सह प्रभागातील मुस्लिम बांधव उपस्थित होते शहरासह जिल्ह्यात पहिल्यांदाच असा आगला वेगळा कार्यक्रम घेण्यात आला रमजान ईद मुस्लिम बाँधवाचा पवित्र सन मानला जातो त्यामुळे सर्व समाजामध्ये एकता आणि बंधुत्व कायम रहावे या उद्देशाने हा आगला वेगळा कार्यक्रम घेण्यात आल्याचे राष्ट्र्वादी कांग्रेसचे जिल्ह्या उपाध्यक्ष बंटी लांडगे यांनी सांगितले या कार्यक्रमा बद्दल प्रभागातील मुस्लिम बाँधवाकडून लांडगे यांचा सत्कार करण्यात आला तसेच सर्वस्तरातून लांडगेच्या कार्याचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *