कंधार ; प्रतिनिधी
कंधार तालुक्यातील , हरिलाल तांडा व बदूतांडा येथे आज दि.२१ मे रोजी टँकर मजूंरीसाठी तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन उपलब्ध स्त्रोताचा आढावा घेवून जाग्यावर मंजूरी दिली आहे.
कोरोना काळात लॉकडाऊन असले तरी ग्रामिण भागात वाडी तांड्यावर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.तात्काळ गरजवंताना टँकरद्वारे पाणी पुरवठा व्हावा म्हणून दि.२१ मे रोजी व्यंकटेश मुंडे तहसीलदार कंधार व गटविकास अधिकारी बळंवत यांनी हरिलाल तांडा व बदूतांडा येथे टॅकर मंजूरी बाबत तपासणी करुन मान्यता दिली आहे. त्यावेळी उपविभागीय अभियंता श्री डिकळे सह गावकरी उपस्थित होते.